नवी सांगवीत विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

मिलिंद संधान
गुरुवार, 7 जून 2018

नवी सांगवी (पुणे) - शिवकालीन शस्त्रास्त्रंचे प्रदर्शन, शिवराज्याभिषेक गुढी, शिवकीर्तन यासारख्या उपक्रमांनी येथील ओम साई ट्रस्टच्या वतीने 344 वा शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. येथील साईचौक सकाळपासूनच भगवे झेंडे व फेटा परिधान केलेल्या तरूणांमुळे भगवामय झाला होता. 

सकाळी स्थानिक नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या हस्ते शस्त्रांस्त्रांचे पुजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या सहकार्याने आयोजित केलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमींनी गर्दी केली होती. सायंकाळी याच ठिकाणी शिवयोध्दा मर्दानी आखाडा यांच्या वतीने लाठीकाठीचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर उपस्थित शिवभक्तांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. सायंकाळी सात वाजता शिवकीर्तनकार डॉ गजानन वाव्हळ यांचे शिवकीर्तन झाले. यावेळी बालकलाकारांनी शिवराज्याभिषेकाचा जीवंत देखावा सादर केला. त्यानंतर उपस्थितांनी शिवाजी महाराजांवर पुष्पवृष्टी केली व जय भवानी... जय शिवराय... या घोषनांनी संपुर्ण साईचौक दुमदुमुन टाकला. 

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील सर्वाधिक 52 फुट उंचीची शिवराज्यभिषेक गुढी नगरसेवक जगताप यांच्या हस्ते उभारण्यात आली. 

Web Title: celebration shivrajyabhishek day ceremony