
-मनोज कुंभार
वेल्हे,(पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या राजगड किल्ल्याचा युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा करण्यासाठी शनिवार (ता.१२) रोजी राजगडच्या पायथ्याशी आमदार,स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषाने राजगडचा परिसर दुमदुमून गेला.