सेलिब्रिटी मातांविषयीचे ‘सुपर मॉम’ पुस्तक प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मार्च 2019

पुणे - ‘चूल आणि मूल’ हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र असे मानण्याचे दिवस केव्हाच संपले. स्त्री आता करिअरच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन स्वतःचे आकाश शोधते आहे. मातृत्वाला करिअरचा फुलस्टॉप न मानता मातृत्वासह कर्तृत्व गाजविण्यास ती सज्ज झाली आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणाऱ्या १८ सेलिब्रिटी महिलांच्या मातृत्वाच्या प्रवासाचा वेध घेणारे ‘सुपर मॉम’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’ने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, या पुस्तकामुळे महिलांमधील मातृत्व व कर्तृत्वशक्तीला मानाचा मुजरा करण्यात आला आहे.

युवा पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या या पुस्तकाची किंमत दोनशे रुपये असून, महिला दिनानिमित्त विशेष सवलतीत ते ‘सकाळ’चे मुख्य कार्यालय, आवृत्ती कार्यालये व वाचक महोत्सवात सहभागी महाराष्ट्रातील शंभरहून अधिक पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. 

यांनी केले आहे लेखन....
या पुस्तकात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य डॉ. राणी बंग, डॉ. शैला दाभोलकर, डॉ. सुरेखा देवी, औद्योगिक क्षेत्रात यशस्वी पाऊल रोवणाऱ्या प्रतिमा किर्लोस्कर, वीणा पाटील, बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेत्री माधुरी दीक्षित, काजोल आणि ऐश्वर्या राय बच्चन, प्रशासकीय सेवेत उत्तम कार्य बजावणाऱ्या किरण बेदी, नीला सत्यनारायण व डॉ. मीनल नरवणे, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर, ज्येष्ठ नृत्यांगना झेलम परांजपे, क्रीडा क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी बजावणाऱ्या अंजली भागवत व ‘विशेष’ जलतरणपटू गौरी गाडगीळला घडवणाऱ्या स्नेहा गाडगीळ, मराठीतील ख्यातनाम लेखिका इंदुमती जोंधळे, कल्पना दुधाळ आणि ‘जू’ या आत्मकथनाने वाचकांच्या मनावर राज्य करणारे ऐश्वर्य पाटेकर यांनी सांगितलेल्या मातृगाथेचा समावेश आहे.

Web Title: Celebrity Mother Super Mom Book Publish