#SaveTrees उजाड असेल का उद्याचं पुणे?

#SaveTrees उजाड असेल का उद्याचं पुणे?

पुणे - शहरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे पसरविताना तसेच पदपथ उभारताना झाडांची काळजी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. रस्त्यांची बांधणी करताना पाणी झाडांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने रचना करणे शक्‍य असतानाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत येत आहे. ‘सिमेंट रस्त्यालगतच्या झाडांची निगा राखली जाते, तेथील झाडाभोवती पुरेशी माती आणि पाण्याचा पुरवठा केला जातो,’ असे ढोबळ उत्तर महापालिका प्रशासनाकडे आहे. 

पुणे शहर आणि उपनगरांत विकासाच्या योजना राबविताना वृक्षसंपदा धोक्‍यात येत असल्याचे उघड झाले आहे. त्यातच, सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील सुमारे दोन हजारपैकी पाचशे किलोमीटर लांबीचे रस्ते हे सिमेंटचे आहेत. एकूण रस्त्यांच्या लांबीपैकी हे प्रमाण २५ टक्के इतके आहे.  या रस्त्यांच्या बांधणीमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याच्याही तक्रारी आहेत.

त्यातच गेल्या काही वर्षांत पुणे शहरातील भूजल पातळी जवळपास ४० टक्‍क्‍यांनी घटल्याचा तज्ज्ञांचा ताजा अहवाल आहे. ती वाढविण्याची गरज व्यक्त झाली असतानाच सिमेंटचे रस्ते करताना मात्र, हिरवाई टिकविण्याच्या दृष्टीने उपाय होत नसल्याचे दिसून येत आहे. सुमारे पाचशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या परिसरातील झाडे धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. 

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘सिमेंटचे रस्ते करताना पर्यावरण राखण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. या रस्त्यांलगतची झाडे वाढविण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी झाडे तोडली आहेत, त्याठिकाणी दुप्पट झाडे लावण्यात आली आहेत.’’ 

२ हजार किलोमीटर - शहरातील एकूण रस्त्यांची लांबी
५०० किलोमीटर - सिमेंट काँक्रीटचे रस्ते 
३९ लाख - झाडांची संख्या

झाडांकडं असं दुर्लक्ष तुम्हालाही दिसलेय? लोकेशनसह आम्हाला टॅग करा किंवा ई मेल करा webeditor@esakal.com वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com