
Grand Sangh Shakti display in Pune with 77 processions and 84 cultural events marking RSS centenary year.
Sakal
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला उद्या (ता. २) दसऱ्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्ष आरंभानिमित्त पुणे महानगरात संघशक्तीचे सादरीकरण होणार आहे. त्या अंतर्गत शहराच्या विविध भागांतून ७७ पथसंचलने आणि ८४ उत्सव होणार आहेत. त्यात २० हजारांहून अधिक स्वयंसेवक गणवेशात सहभागी होणार आहेत.