esakal | आता फसव्या जाहीरातींना बसणार चाप; सरकारने बनवली स्पेशल अॅथोरिटी!
sakal

बोलून बातमी शोधा

Consumer_Protection

जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे वस्तू दिली नसेल, त्या वस्तूतून कोणाचे नुकसान झाले, तसेच कुणाला काही इजा झाली, तर अशा प्रकारची तक्रार प्राधिकरणाकडे दाखल करता येऊ शकते.​

आता फसव्या जाहीरातींना बसणार चाप; सरकारने बनवली स्पेशल अॅथोरिटी!

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे : ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी यासाठी तिचे वैशिष्ट्य फुगवून सांगितले जात असल्याचे प्रकार होत असतात. त्यातून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ग्राहक संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ची स्थापना स्थापना करण्यात आली आहे. 
केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था खात्याने याबाबत अध्यादेश काढला असून प्राधिकरणाचे कामकाज शुक्रवार (ता.२४) पासून सुरू होणार आहे.

लॉकडाऊन संपला अन् पुण्यातील रस्त्यांवर वर्दळ झाली सुरू​

दिल्लीत मुख्य कार्यालय असलेल्या या प्राधिकरणाच्या प्रमुखपदी सरकारकडून मुख्य आयुक्तांची निवड केली जाणार आहे. आयुक्त दर्जाचे इतरही अधिकारी त्यात असतील. फसव्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींना निर्बंध घालण्याचे प्रमुख काम प्राधिकरणाकडे असणार आहे. ग्राहकाची तक्रार आल्यानंतर किंवा प्राधिकरण स्वतःहून अशा प्रकरणात लक्ष घालून तक्रार दाखल करून त्यावर सुनावणी घेऊ शकणार आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर तिची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग असणार आहे. कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, उत्पन्नात सुरक्षा, वाणिज्य यासह विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ व्यक्ती त्यात असणार आहेत. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन तपासणे आणि खटला चालवणे, अन्यायकारक व्यापार पद्धती बंद करणे आणि दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर दंड आकारणे आदी अधिकार प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. 

या तरुणाचे करावे तेवढे कौतुक कमीच, अडीच वर्षात 20 वेळा प्लेटलेट्सचे दान​ 

तर वस्तू आणि सेवा परत करता येणार : 
जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे वस्तू दिली नसेल, त्या वस्तूतून कोणाचे नुकसान झाले, तसेच कुणाला काही इजा झाली, तर अशा प्रकारची तक्रार प्राधिकरणाकडे दाखल करता येऊ शकते. तक्रारीची पडताळणी करून दोष सिद्ध झाल्यास संबंधित वस्तू किंवा सेवा परत कंपनीला मागे घेण्यास सांगण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत.

समितीची स्थापना झाल्याने ग्राहकांना थेट केंद्रीय पातळीवर तक्रार दाखल करता येणार आहे. प्राधिकरणातील अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती होणे अद्याप बाकी आहे. नियुक्ती होणार असलेल्या आयुक्तांना कायदेशीर बाबींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण तक्रार दाखल झाल्यावर त्यावर सुनावणी घेऊन निकाल देण्याचे न्यायिक अधिकार त्यांना असणार आहेत. 
- ऍड. ज्ञानराज संत,  उपाध्यक्ष, कन्झ्युमर अ‍ॅडव्होकेट असोशिएशन

प्राधिकरणाला आहेत हे अधिकार :
- अनुचित व्यापार पद्धतींवर स्वतःहून तक्रार दाखल करणे
- दाखल तक्रारीवर सुनावणी घेणे
- एखाद्या उत्पादनाच्या ठिकाणी धाड टाकणे
- सदोष वस्तू आणि सेवा पुन्हा मागून घेणे 
- फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा सुनावणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image