esakal | लॉकडाऊन संपला अन् पुण्यातील रस्त्यांवर वर्दळ झाली सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-University-Traffic

लॉकडाऊन संपल्यामुळे औंध,बाणेर व पाषाण या तिन्ही रस्त्यावर वाहनाची गर्दी वाढल्याने आणि उड्डाणपुल पाडण्याचे काम सुरु असल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात शुक्रवारी सकाळपासूनच वाहतुक संथ गतीने सुरु आहे. वाहनाची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी औंधकडुन विद्यापीठ चौकात सुरु केलेली दुहेरी वाहतुक बंद करुन ती पाषाण, अभिमान श्री, औंध मार्गे वळविली आहे.

लॉकडाऊन संपला अन् पुण्यातील रस्त्यांवर वर्दळ झाली सुरू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाऊन संपल्यामुळे औंध,बाणेर व पाषाण या तिन्ही रस्त्यावर वाहनाची गर्दी वाढल्याने आणि उड्डाणपुल पाडण्याचे काम सुरु असल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात शुक्रवारी सकाळपासूनच वाहतुक संथ गतीने सुरु आहे. वाहनाची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी औंधकडुन विद्यापीठ चौकात सुरु केलेली दुहेरी वाहतुक बंद करुन ती पाषाण, अभिमान श्री, औंध मार्गे वळविली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महानगर विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) विद्यापीठ चौकात उड्डाणपुल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले आहे. तसेच तेथे मेट्रो पुल देखील बांधला जाणार आहे. त्यानुसार मागील आठवडयात लॉकडाऊन सुरु होताच पुल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले.

मध्य महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा; १२ तासांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस

दरम्यान,शुक्रवारी लॉकडाऊन संपल्यानंतर विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात वाहने येऊन वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार औंध, बाणेर व पाषाण रस्त्यावर शुक्रवारी सकाळपासून वाहनाची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. तर उड्डाणपुल पाडण्याचे काम सुरु असल्याने शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता आगोदरच अरुंद झाला आहे, त्यामुळे तिन्ही रस्त्यावरील वाहनाचा ताण या रस्तयावर आल्याने वाहतूक संथ झाली. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतुक शाखेच्या पोलिसांकडुन चौकात उभे राहुन हातावर वाहतुक पुढे काढली जात आहे. मात्र शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत.

मित्रांसोबत गप्पा मारत असताना त्याच्यावर ६ जणांनी सपासप तलवारीने वार केले अन्... 

औंधकडील वाहतूक पाषाण, अभिमान श्री मार्गे वळविली 
वाहतूक शाखेकडुन शिवाजीनगरहुन येणाऱ्या व औंधला जाणाऱ्या वाहनासाठी औंधकडुन विद्यापीठ चौकात येणाऱ्या रस्त्यावर लॉकडाऊनमध्ये दुहेरी वाहतूक सुरु केली होती. मात्र वाहनाची गर्दी वाढल्याने शुक्रवारी सकाळपासुन दुहेरी रस्त्यामुळे वाहतुक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चतु:श्रृंगी वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी दुहेरी वाहतुक थांबवुन ती पाषाण,अभिमान श्री, औंध आयटीआय मार्गे औंध व पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या रस्तयावर वळविली आहे.

पुणे : जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची चिंता होणार कमी; कारण...

असा आहे वाहतुक बदल 
- औंध, बाणेर, पाषाण येथून येणाऱ्या वाहनाना विद्यापीठ चौकातुन सरळ शिवाजीनगरला जाता येईल.
- चतु:शृंगी कॉर्नरवरुन सेनापती बापट रस्त्यावर वळता येणार नाही.
- शिवाजीनगरहुन सेंट्रल मॉलपासून काही मीटर अंतरावर असलेल्या धोत्रे पथावरुन ओम सुपर मार्केट, जेडब्ल्यू मेरीयट हॉटेल चौक व चतु:शृंगी कॉर्नर व विद्यापीठ चौक
- औंधकडे जाणाऱ्या वाहनानाही आता पाषाण,अभिमान श्री सोसायटी, औंध आयटीआय मार्गे औंध व पिंपरी-चिंचवडकडे जाता येईल.
- पाषाणकडे नेहमीप्रमाणे सरळ जाता येईल.
- बाणेरकडे जाणाऱ्या वाहनानाही अभिमान श्री सोसयटीला वळस घालुन पुढे जाता येईल.

* विद्यापीठ चौकातील ताण टाळण्यासाठी वाहनचालकांनी खडकी मार्गे किंवा चांदणी चौक मार्गे पुण्यात जाण्यास प्राधान्य देण्याचे पोलिसांचे आवाहन

Edited By - Prashant Patil

loading image