esakal | या तरुणाचे करावे तेवढे कौतुक कमीच, अडीच वर्षात 20 वेळा प्लेटलेट्सचे दान
sakal

बोलून बातमी शोधा

swapnil lonkar

स्वप्नील सुनील लोणकर या तरुणाने मागील अडीच वर्षापासून 20 वेळा रक्तातील प्लेटलेट्सचे दान करून दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या अनेकांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे.

या तरुणाचे करावे तेवढे कौतुक कमीच, अडीच वर्षात 20 वेळा प्लेटलेट्सचे दान

sakal_logo
By
सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेला व मूळचा पुण्यातील हडपसर येथील असलेल्या स्वप्नील सुनील लोणकर या तरुणाने मागील अडीच वर्षापासून 20 वेळा रक्तातील प्लेटलेट्सचे दान करून दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या अनेकांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. त्याचे हे काम समाजातील तरुणांपुढे निच्छित प्रेरणादायी आहे.

जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची चिंता कमी होणार

कोरोनो विषाणू संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक रुग्णांना रक्ताची गरज पडत आहे. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत. त्याचवेळी कोरोनो रुग्णांवर करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपचार पद्धतीत प्लाझ्मा थेरीपी चर्चेत आली आहे. कोरोनातून बरे झालेले आपला प्लाझ्मा दान करत आहे. अशाच प्रकारे डेंगी, कॅन्सर व विषाणुजन्य ताप अशा विविध प्रकारच्या आजारांच्या उपचारात प्लेटलेट्सचे असणारे महत्व ओळखून मूळचा हडपसर (पुणे) येथील स्वप्नील लोणकर या तरुणाने मागील अडीच वर्षापासून 20 वेळा प्लेटलेट्स दान केले आहे.

आता शुभमंगल सावधान म्हणा वीस लोकांमध्येच

शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन जीवनातच राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून तो सामाजिक काम करू लागला, त्यातूनच तो नित्यपणे रक्तदान करत असे. त्यातच त्याला प्लेटलेट्स डोनेशनविषयी माहिती मिळाली. अशातच एस.डी.पी. डोनेशन (सिंगल डोनर प्लेटलेट्स) या विषयी त्याला माहीती मिळाली. डेंगी आणि कॅन्सर उपचार थेरपीचा काळात प्लेटलेट्सची भासणारी गरज व त्याचे महत्त्व त्याने जाणून घेतले आणि इथून सुरू झाला त्याचा प्लेटलेटस् दानाचा प्रवास.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
मागील अडीच वर्षापासून तो एक नित्यदाता म्हणून एस.डी.पी. दान करीत आहे आतापर्यंत वीस वेळा ही प्रक्रिया केली आहे. जनकल्याण रक्तपेढी (स्वारगेट) या ठिकाणी तो एसडीपी डोनेशन करीत असतो. त्याचप्रमाणे गरजेनुसार पुणे शहरातील इतर काही हॉस्पिटलमध्ये देखील एसडीपी डोनेशन चालू असते. जनमाणसांमध्ये एचडीपी डोनेशनविषयी असणारी अजागरूकता लक्षात घेऊन विश्वजीत काशीद (गुडवील ॲम्बेसिडर प्लेटलेट डोनेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेटलेट्स दानाचे महत्व जनसामान्यांमध्ये पोचविण्यासाठी विविध ठिकाणी, विविध स्तरांवर जागृतता कार्यक्रमाचे आयोजन तो करत असतो, मग ते गावाच्या चावडीवर असो किंवा मोठमोठ्या महाविद्यालयांच्या सभागृहांमध्ये, आत्तापर्यंत जवळपास वेगवेगळ्या वीस ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांमधून सुमारे पाच हजाराहुन अधिक लोकांपर्यंत प्लेटलेट्स दानाचे महत्व त्याने पोहोचवले आहे. हाच प्रयत्न या पुढे निरंतर चालू ठेवणार असल्याचे त्याने सांगीतले. 

डेंगी, कॅन्सर अथवा विषाणुजन्य तापात रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्स अचानक कमी होतात. या वेळी बाहेरून रक्तात प्लेटलेट्स भरल्यास रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसेंदिवस प्लेटलेट्सचे महत्व वाढू लागले आहे. स्वप्नील लोणकर याने आतापर्यंत 20 वेळा प्लेटलेट्स दान केले आहे. समाजातील सशक्त तरुणांनी पुढे येऊन प्लेल्टलेट्स दान केल्यास दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्यांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे तरुणांनी प्लेटलेट्स दान करण्यासाठी पुढे यावे.
 - संतोष अंगोलकर
जनसंपर्क आधिकारी, जनकल्याण रक्तपेढी, स्वारगेट (पुणे)
   

loading image
go to top