तब्बल शंभर दिवसानंतर रविवार पेठेतील बाजारपेठ उद्यापासून सुरु होणार

the central part of the wholesale market continues in pune the combined decision of Traders and police
the central part of the wholesale market continues in pune the combined decision of Traders and police
Updated on

पुणे : चॉकलेट-गोळ्यांपासून ते प्लॅस्टिकच्या घरगुती वापराच्या वस्तू आणि खेळण्यापर्यंतच्या वस्तू संपूर्ण शहरासह पश्‍चिम महाराष्ट्राला पुरवठा करणारी रविवार पेठेतील बाजारपेठ तब्बल शंभर दिवसानंतर खुली होणार आहे. उद्यापासून (गुरुवार) "पी वन- पी टू' या पद्धतीने सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत या बाजारपेठेतील दुकाने खुली करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. 

पुण्यात आरटीओचे कामकाज पूर्ववत होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 मार्च पासून लॉकडाऊन लागू केले. त्यानंतर रविवार पेठ, शुक्रवार पेठ, भोवरी आळी, कापडगंज भागातील व्यापारी बाजारपेठ बंद झाली होती. घरगुती वापरल्या प्लास्टिकच्या वस्तू, झाडू, पावसाळ्यात घरावर टाकावयाचे प्लॅस्टिकचे कागद, चॉकलेट, गोळ्या, प्लॅस्टिकची सुशोभीवंत झाडे, टिकल्या,रेनकोट, छत्र्या, ज्वेलरी ऍटम, वह्या- पुस्तके, स्टेशनरी साहित्य, कापड, गांधी टोप्यापासून अनेक वस्तूंची ही घाऊक बाजारपेठ आहे. या पेठेतून शहराबरोबरच पुणे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात मालाचा पुरवठा होतो. तो लॉकडाऊनमुळे या वस्तूंची पुरवठा साखळी खंडित झाली होती. 

झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करतात असं काही

या पेठा कंन्टेमेन्ट झोनमध्ये येत असल्याने ऍनलॉक एक मधील देखील येथील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. ती द्यावी, अशी मागणी तेथील व्यापारी गेल्या काही दिवसांपासून करीत होते. मध्यंतरी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेले सौरभ राव यांनी त्या भागात भेट देऊन पाहणी देखील केली होती. ही बाजारपेठ खुली करण्याबाबतचे अधिकार महापालिकेने पोलिसांना दिले होते. त्यानुसार आज पोलिस आणि तेथील व्यापाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये दुकाने सुरू करण्यासंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला, अशी माहिती तेथील पुणे शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी सांगितले. ते म्हणाले," पी वन- पी टू' या पद्धतीने उद्यापासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत ही दुकाने सुरू करण्यात येणार आहेत

पुण्यात आता पीएपी बससेवा सुरू होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com