‘सेंट्रल पूल’ची चौकशी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त विभागात नियमाचे उल्लंघन करून ‘सेंट्रल पूल’मधून अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैस वाटप करण्यात आले. त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला नेमके कोणत्या काळातील किती पैसे आहे, याची माहिती अजूनही देण्यात आली नाही. यामुळे सात महिन्यानंतरही या प्रकरणाची चौकशी अजून सुरू असल्याचे अधिसभेत समोर आले.

सात महिन्यांनंतरही अपेक्षित कार्यवाही नाही; अधिसभेत झाली चर्चा 
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त विभागात नियमाचे उल्लंघन करून ‘सेंट्रल पूल’मधून अधिकारी, कर्मचाऱ्यांना पैस वाटप करण्यात आले. त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला नेमके कोणत्या काळातील किती पैसे आहे, याची माहिती अजूनही देण्यात आली नाही. यामुळे सात महिन्यानंतरही या प्रकरणाची चौकशी अजून सुरू असल्याचे अधिसभेत समोर आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यवस्थापन परिषदेने सेंट्रल पूल, गोपनीय कामाचे भत्ते यासह इतर कामाचे मानधन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाटण्यावर बंधने आणली आहेत. तरीही वित्त विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुमारे ६० लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. याबाबत ‘सकाळ’ने गेल्या जुलै महिन्यात वृत्त प्रसिद्ध केले होते.  त्यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी हे पैसे वसूल केले जातील, असे आश्‍वासन दिले होते.

पुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी

दरम्यान, ‘सेंट्रल पूल’च्या निधी वाटपाची वास्तविकता तपासण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्त करण्यात आली आहे. 

अधिसभा सदस्य राजीव साबडे यांनी या निधीच्या वाटपाबाबत प्रश्‍न विचारला असता ६० लाख रुपयांची रक्कम वाटप केली नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले होते. त्यावरून अधिसभेत चर्चा सुरू झाली. त्यावेळी समितीचे सदस्य डॉ. महेश अबाळे म्हणाले, ‘‘व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानंतरही हे पैसे देण्यात आले आहेत. मात्र, परिपत्रक काढण्यापूर्वीची एकूण रक्कम कधी व परिपत्रकाचे नियम लागू झाल्यानंतरची रक्कम किती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही माहिती वित्त विभागाकडून अजूनही उपलब्ध झालेली नाही.’’

पालकांनो, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाकडून तुमची दिशाभूल होतेय का? मग ही बातमी वाचाच

सर्व पैसे वसूल केले जातील हे यापूर्वी सांगितले आहे. त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पण, आदेश लागू झाल्यानंतरचे आणि आधीचे पैसे किती आहेत, हे समितीमार्फत तपासले जात आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Pool inquiry continues