esakal | महत्त्वाची बातमी: MBBS, BDSच्या जागा जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये अॅडमिशनसाठी रंगणार चुरस
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Medical

राज्य सरकारने वैद्यकीय प्रवेशांसाठी प्रादेशिक विभागानुसार असणारा ७०:३०चा कोटा रद्द केला आहे. यापूर्वी, प्रवेशासाठी कोटा राखीव असल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी मिळत होती.

महत्त्वाची बातमी: MBBS, BDSच्या जागा जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये अॅडमिशनसाठी रंगणार चुरस

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या 'नीट'चा कटऑफ वाढल्याने 'एमबीबीएस'च्या प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे. अशात आता महाराष्ट्रात 'एमबीबीएस'साठी शासकीय आणि खासगी महाविद्यालयांमध्ये ६ हजार ६०० जागा उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. तर, 'बीडीएस'साठी २ हजार ६७६ प्रवेश क्षमता आहे. ही माहिती सीईटी सेलने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. 

बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो प्राॅक्टर्डबाबत झाला मोठा निर्णय; परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर​

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी १२ नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे, पण यंदा महाराष्ट्रात किती जागा उपलब्ध आहेत याबाबत स्पष्टता नसल्याने अर्ज भरताना विद्यार्थ्यांना स्पर्धेचा अंदाज येत नव्हता. सीईटी सेलने प्रवेशक्षमता जाहीर केल्याने राज्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्राच एकूण २५ शासकीय वैद्यकीय असून, त्यामध्ये ४ हजार ३३० जागा आहेत. तर १८ खासगी महाविद्यालयांमध्ये २ हजार २७० जागा उपलब्ध आहे. राज्यातील ४ शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (बीडीएस) ३२६ जागा, २५ खासगी दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २ हजार ३५० जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती सीईटी सेलने संकेतस्थळ जाहीर केली आहे.

मोठी बातमी : विद्यार्थी-शिक्षकांची दिवाळी होणार आणखी गोड; दिवाळीच्या सुट्टीत वाढ

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांपैकी १५ टक्के जागा ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. यंदा नीटचा निकाल चांगला लागल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी मोठी चुरस असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्य सरकारने वैद्यकीय प्रवेशांसाठी प्रादेशिक विभागानुसार असणारा ७०:३०चा कोटा रद्द केला आहे. यापूर्वी, प्रवेशासाठी कोटा राखीव असल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी मिळत होती. यंदा, मात्र यांच्यासोबत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे. तर  यापूर्वी, प्रवेशासाठी कोटा राखीव असल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी मिळत होती. यंदा, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)