"सीईटी, जेईई आणि नीट' प्रवेश परीक्षांविषयी मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पुणे - वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रवेश परीक्षांचे स्वरूप, तयारी नेमकी कधीपासून करावी, जेईई आणि सीईटीचा संयुक्तरीत्या अभ्यास कसा करावा, याविषयी मुले व पालक यांच्या मनात अनेक शंका असतात. त्याचे निरसन करण्यासाठी "सकाळ विद्या' आणि "आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र' यांच्या वतीने येत्या रविवारी (ता. 4 डिसेंबर) मोफत मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केले आहे. 

उत्तम इंजिनिअर बनण्यासाठी पाया मजबूत होणे गरजेचे असते. जेईई परीक्षेची तयारी करतानाच इंजिनिअरिंगच्या पुढील चारही वर्षांची भक्कम तयारी होत असते. वास्तविक जेईईच्या तयारीचा फायदा सीईटीच्या तयारीसाठीही होत असतो; पण दोन्ही परीक्षांचा अभ्यास कसा करावा, याविषयी विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसते. 

चांगल्या गुणांसाठी जेईई व सीईटीच्या अभ्यासाची योग्य सांगड कशी घालावी, त्याचबरोबर वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी महत्त्वाच्या असलेल्या "नीट' परीक्षेचा अभ्यास कसा करावा आणि नीटमध्ये असलेला फिजिक्‍स, केमिस्ट्रीचा अभ्यासक्रम सीईटीच्या फिजिक्‍स आणि केमिस्ट्रीपेक्षा कसा वेगळा आहे, तसेच या परीक्षांची तयारी 7 वी व 8 वीपासूनच कशी करावी, याबद्दल चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे. 

"आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे' संस्थापक संचालक दुर्गेश मंगेशकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेश विनामूल्य व मर्यादित असून, संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. 

चर्चासत्राविषयी... 
कुठे : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी सभागृह), शिवाजीनगर, पुणे 
कधी : रविवार, ता. 4 डिसेंबर 2016 
वेळ : सकाळी 10.30 वा. 
मार्गदर्शक : दुर्गेश मंगेशकर 
कोणासाठी : 7 वी ते 10 वीचे विद्यार्थी 
नोंदणी आवश्‍यक : www.vidyaseminars.com 
अधिक माहितीसाठी संपर्क : 9923645679 

Web Title: CET, JEE guidance about entrance exams