विद्यापीठात संरक्षण विभागाची ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’

दोन कोटींची तरतूद; संरक्षण आणि लष्करासंबंधी होणार अभ्यास
Pune-University
Pune-Universitysakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागात संरक्षण मंत्रालयाकडून ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अध्यासनासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. ही ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ मिळवणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग हा भारतातील एकमेव विभाग आहे. देशभरातील विद्यापीठाकडून लष्कराने चेअर ऑफ एक्सेलेन्स संबंधी प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी १०० विद्यापीठाकडून अर्ज करण्यात आले होते. या सर्व प्रस्तावातून विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाची कामगिरी लक्षात घेता हे अध्यासन येथे स्थापन करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. (Pune News)

Pune-University
गिर्यारोहक स्मिता घुगे यांनी फडकवला सातसमुद्रापार 'तिरंगा'

याआधी संरक्षण व सामरिकशास्त्र विभागामध्ये भारतीय भुसेनेद्वारे १९९४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे तसेच भारतीय वायुसेनेद्वारे फेब्रुवारी २०२० मध्ये 'मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग' यांच्या नावे 'चेअर ऑफ एक्सेलेन्स' मिळाले आहे. बदलत्या भू-राजनैतिक, भू राजकीय पद्धतीचा विचार करता विभागाने नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, पाच वर्षाचा एकात्मिक अभ्यासक्रम यांसह नवीन उपक्रम राबविले जात आहेत.

अध्यासन कशा करता?

  • लष्करी इतिहास आणि सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत सर्वसामान्यांना माहिती मिळावी

  • लष्कराचे धोरण, राष्ट्रीय सुरक्षेसबंधीची आव्हाने, युद्धविषयक नीती याबाबत राष्ट्रीय पातळीवर अभ्यास व्हावा

  • यासंबंधीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी

  • विद्यार्थ्यांना संरक्षण आणि लष्करासंबंधीच्या संशोधनाला वाव मिळेल.

Pune-University
विज्ञान प्रसार’च्या चित्रपट महोत्सवात विद्यापीठाची बाजी

संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग हा देशातील एकमेव विभाग आहे ज्यामध्ये भू सेना, वायू सेना व संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयाने 'चेअर ऑफ एक्सेलेन्स' ची स्थापना करण्यात आली आहे. पुढील काळात भारतीय नौसेनेसोबतही 'चेअर ऑफ एक्सेलेन्स' स्थापन करण्याचा आमचा मानस असून यासाठीचा प्रस्तावही नौसेना मुख्यालयात पाठविला आहे. - डॉ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग

संरक्षण मंत्रालयाद्वारे विभागाला ‘चेअर ऑफ एक्सेलेन्स’ मिळाल्याबद्दल अत्यंत आनंद आहे. विद्यार्थ्यांना यामुळे या विषयांमध्ये संशोधन करण्याची संधी निर्माण झाली आहे. - प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com