Chakan News : आदित्य भांगरे याच्या खुनाची चाकण पोलिसांकडून उकल; एकास अटक

चाकण पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर आरोपी शिंदे व इतरांनी आदित्य भांगरे याचे अपहरण करून त्याचा मृतदेह गुजरात राज्यात अर्धवट जाळून टाकला असल्याचे सांगितले.
chakan crime aditya bhangre murder case one arrested pimpri chinchwad police
chakan crime aditya bhangre murder case one arrested pimpri chinchwad policeSakal

Chakan News : रासे फाटा येथे मराठा हॉटेलमध्ये स्वप्नील शिंदे याच्यावर गोळीबार झाला होता त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना त्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेताना आरोपी अमर नामदेव शिंदे (वय -25 वर्षे, रा.कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे )यास चाकण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.

चाकण पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर आरोपी शिंदे व इतरांनी आदित्य भांगरे याचे अपहरण करून त्याचा मृतदेह गुजरात राज्यात अर्धवट जाळून टाकला असल्याचे सांगितले. आदित्य भांगरे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमर शिंदे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.अशी माहिती पिंपरी चिंचवड चे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, " आरोपी अमर शिंदे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली. रेकॉर्डवरील आरोपी राहुल संजय पवार यांचा भाऊ रितेश संजय पवार यांचा तीन महिन्यापूर्वी महाळुंगे येथे निर्घृनपणे खून करण्यात आला होता.

रितेश संजय पवार याच्या छिन्हविचिन्ह झालेल्या मृतदेहाचा स्टेट्स आदित्य भांगरे याने इंस्टा वर वारंवार ठेवला होता. त्या रागातून त्याच्या खुनाचा राहुल पवार यांच्या सांगण्यावरून कट करून आरोपी शिंदे व त्याचे सहकारी राहुल पवार रा. महाळुंगे, अभिजीत मराठे रा.कोथरूड, पुणे, आसिफ उर्फ आशु हैदर हापसी रा.कासारवाडी,पुणे यांनी मिळून रेकॉर्डवरील आरोपी राहुल पवार उर्फ आर. पी याच्या सांगण्यावरून ता. 16 ला दुपारी महाळुंगे येथून आदित्य भांगरे यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले.

त्याला बेदम मारहाण करून वायरच्या साह्याने गाडीमध्येच त्याचा गळा आवळून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली.या माहितीवरून महाळुंगे पोलिसांकडे चौकशी केली असता आदित्य भांगरे बेपत्ता झाला होता.

त्याबाबत महाळुंगे पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आलेली होती. या प्रकाराबाबत महाळुंगे पोलीस ठाणे येथे आरोपीवर गुन्हा दाखल असल्याने आरोपी अमर शिंदे याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी महाळुंगे पोलीसांच्या ताब्यात चाकण पोलिसांनी दिला. त्यानंतर महाळुंगे पोलिसांनी या आरोपीकडे गुन्ह्याचा सखोल तपास केला असता आरोपीने मयत आदित्य भांगरे यांचे प्रेत वेलवाडा गुजरात येथे अर्धवट जळालेल्या स्थितीत दाखविले.

हा मृतदेह पुढील कारवाईसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.गोळीबार व खुनाच्या प्रकरणातील उर्वरित आरोपीचा शोध चाकण व महाळुंगे पोलीस आणि तपास पथकातील अधिकारी,अंमलदार घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उपायुक्त शिवाजी पवार,सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे,सहाय्यक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार संदीप सोनवणे,

राजू जाधव,हनुमंत कांबळे,निखिल शेटे,नितीन गुंजाळ,सुनील भागवत,संदीप गंगावणे,अशोक दिवटे, प्रदीप राळे,निखिल वर्पे,महेश कोळी, माधुरी कचाटे यांनी केली असून खुनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते करत आहेत.

महाळुंगे पोलीस निरीक्षक गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष कसबे, कल्याण घाडगे,पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय,महाळुंगे पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार राजेंद्र कोणकीरी, अमोल बोराटे,तानाजी गाडे,विठ्ठल वडेकर,अजय गायकवाड,संतोष वायकर,गणेश गायकवाड,राजेंद्र खेडकर, शरद खैरे यांनी केलेला आहे.

आरोपींनी हिंदी दृश्यम चित्रपटातील कथेसारखे कृत्य केले आहे.यातील मुख्य आरोपी राहुल पवार आहे तो फरारी आहे त्याचाही शोध पोलीस पथके घेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com