धुळवडीनिमित्त मटण खरेदीसाठी रांगा

धुळवडीनिमित्त मटण खरेदीसाठी रांगा

Published on

चाकण, ता. ३ : चाकण व औद्योगिक वसाहत परिसरात धुळवडीमुळे सकाळपासूनच चिकन, मटण दुकानांपुढे ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांनी कुटुंबीय व मित्रमंडळींसाठी विशेष जेवणाचे आयोजन केले होते.परिणामी चिकन व मटणाच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चाकण परिसरातील धुळवडीच्या सणामुळे हॉटेल, ढाबे खवय्यांनी फुल्ल झाले होते. मटन, चिकन त्याचबरोबर मद्याला मोठी मागणी होती.
चिकन मटण चे भाव वाढलेले असताना मागणी ही मोठ्या प्रमाणात होती. चाकण व परिसरातील गावात औद्योगिक वसाहत परिसरात चिकन व मटणाची हजारो किलोची मागणी राहिली.
चिकन, मटणाचे प्रति किलोचे बाजारभाव (रुपयांत) पुढीलप्रमाणे : चिकन -३४०, मटण -बोकड -९००, बकरू -८४०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com