Chakan Crime News : चाकणच्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला पनवेलला अटक

एकाने पनवेल येथे जाऊन पोलीस उपनिरीक्षकाचा वेश परीधान करून तोतया पोलीस अधिकारी बनला. एका हॉटेल व्यवस्थापकाला धमकावून शिवीगाळ करून मारहाण केली.
chakan Fake Police Officer Arrested in Panvel
chakan Fake Police Officer Arrested in PanvelSakal

Chakan News : येथील एकाने पनवेल येथे जाऊन पोलीस उपनिरीक्षकाचा वेश परीधान करून तोतया पोलीस अधिकारी बनला. एका हॉटेल व्यवस्थापकाला धमकावून शिवीगाळ करून मारहाण केली.

हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क केल्यानंतर पोलीस अधिकारी, पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर त्यांनी चाकण,पुणे येथून आलेल्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणाऱ्या तरुणाकडे चौकशी केली असता तो तोतया पोलीस अधिकारी निघाला.

या तोतया ला पोलिसांनी अटक केली आहे. सलमान तजमुद्दीन मुलानी( वय -31 वर्ष, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.अशी माहिती पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी आज दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, " सलमान मुलानी याने पनवेल येथील सिताज हॉटेलात जाऊन मी पोलीस अधिकारी आहे असे भासवून हॉटेल व्यवस्थापकाला "माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले, चल आत्ताचे आता तिचा हिशोब कर आणि लगेच कामावर घे नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकीन " अशी धमकी दिली.

हॉटेल व्यवस्थापकाला शिवीगाळ करून मारहाण केली. हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी त्याचा भांडाफोड केला. आरोपी मुलाणी हा पोलीस अधिकारी नसताना तोतयागिरी करून पोलीस उपनिरीक्षका प्रमाणे गणवेश परिधान करून वावरत होता.

त्याने इतर कोणाला फसविले आहे काय याबाबत आरोपीकडे पोलीस तपास करत आहेत . ही कारवाई पोलीस आयुक्त,सह आयुक्त,उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी,पोलिसांनी केली आहे. पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतलेला वर्तुळातील चाकणचा तोतया पोलीस अधीकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com