Chakan Crime News : चाकणमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट, अंमली पदार्थाचा व्यापार ही वाढतोय
Chakan Crime News : चाकणमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट, अंमली पदार्थाचा व्यापार ही वाढतोय Sakal

Chakan Crime News : चाकणमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट, अंमली पदार्थाचा व्यापार ही वाढतोय

चाकण औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थ, मोठया प्रमाणात बेकायदा गुटख्याचा वापर वाढतो आहे या मोठया साखळ्या आहेत त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे

Chakan News : चाकण व परिसरात औद्योगिक वसाहतीत तसेच महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच पुणे -नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात, चाकण -तळेगाव मार्गांवरील खालुंब्रे चौकात, भांबोली चौकात रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडवजा खोल्यात पडदे लावून अवैध धंदे मटका, जुगार सुरू आहेत.

अनेकजण या धंद्यात गुंतले आहेत अगदी काही राजकीय नेते, कार्यकर्ते, गुन्हेगार तसेच काही पोलीस ही हे धंदे चालवीत आहेत. त्यातून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. "इझी मनी" मिळविण्याचे हे महत्वाचे साधन आहे.

त्यामुळे अवैध धंद्याचा सुळसुळाट मोठा आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थ, मोठया प्रमाणात बेकायदा गुटख्याचा वापर वाढतो आहे या मोठया साखळ्या आहेत त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे व या धंद्याकडे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष आहे का नाही हा सवाल नागरिकांचा, कामगारांचा, उद्योजकांचा आहे.

चाकण, ता. खेड परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात गावामध्ये चाकण, नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी, आळंदी फाटा, कुरुळी, निघोजे, खालुंब्रे, भांबोली, कोरेगाव फाटा, बिरदवडी, वाकीखुर्द, रासे फाटा, भोसे,काळुस, कुरुळी इंद्रायणी नदीच्या पुलाखाली,महाळुंगे,शेलपिंपळगाव,

संगमवाडी,भाम याठिकाणी अवैध धंदे मोठया प्रमाणात वाढले आहेत. अगदी चाकण च्या पुणे -नाशिक महामार्गांवर तळेगाव चौकात रस्त्यालगत असलेल्या काही पत्र्याच्या शेडवजा खोल्यांत अवैद्य धंदे सराईतपणे सुरू आहेत.

अगदी वाहतूक विभागाच्या पोलीस चौकीच्या जवळ तळेगाव चौकात हे धंदे सुरु आहेत.त्यामुळे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी नेमके काय करतात हा सवाल निर्माण होत आहे.चाकण औद्योगिक परिसरात राज्यातुन तसेच देशभरातून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आला आहे.

मध्यमवर्गीय माणूस, मजूर,कामगार, काही गुंठा मंत्री अवैद्य धंद्याचा मोठा ग्राहक आहे असे भयानक वास्तव आहे. चाकणला तळेगाव चौकात वाहतूक विभागाचे पोलीस असतात.परंतु या अवैध धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

चाकण, महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या गावामध्ये अगदी पत्र्याच्या शेड वजा खोल्यांमधून, काही फ्लॅट मधून मटका, जुगार व इतर अवैध धंदे चालतात. हे अवैध धंदे अगदी वर्दळीच्या ठिकाणी चालतात.

चाकण,महाळुंगे परिसरात या अवैध धंद्यासाठी मोठा ग्राहक मिळत असल्याने अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे धंदे काही राजकीय नेते, गुन्हेगार, पदाधिकारी, कार्यकर्ते, पिंपरी- चिंचवड, पुणे, मावळ मधील काही लोक,

काही पोलीस चालवतात असाही नागरिकांचा आरोप आहे.चाकण परिसरात काही वर्षांपूर्वी एक सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने अगदी फ्लॅट मध्ये पत्त्याच्या जुगार या अवैध धंद्याचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट केला होता.चाकण औद्योगिक परिसरात काही लोक अंमली पदार्थाचीही विक्री करतात त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, "चाकण,महाळुंगे परिसरातील अवैध धंदे जे सुरु असतील त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com