Weapon : स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणे म्हणजे एक फॅशन होतेय का?

सध्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणूनच शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढतेय असे चित्र आहे.
Gun
Gunsakal

चाकण - ज्यांच्यावर हल्ला झाला आहे. ज्यांच्या जीविताला धोका आहे असे काही जण उद्योजक, व्यावसायिक, काही राजकीय नेते, काही कार्यकर्ते, अगदी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले बंदुका, पिस्तूल बाळगतात. खरच ही फॅशन होतेय का? असे वास्तव आहे. स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने लवकरही मिळतात. सध्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणूनच शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढतेय असे चित्र आहे. त्या शस्त्रांचा वापर दुसऱ्यासाठी घातक होतोय का असेही चित्र निर्माण होत आहे.

सध्याच्या काळातही बंदूक, पिस्तूल वापरण्याची हौस अनेकांना आहे.त्यातून मी किती मोठा आहे, मी कोण आहे याचे शक्तीप्रदर्शन केले जाते. शस्त्र परवानाधारक काहीजण कमरेला हे शस्त्र दुसऱ्याला दिसेल अशा पद्धतीने ठेवतात. हे शस्त्र कमरेला अडकवून काही समारंभात, कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करतात.

शस्त्र परवाने मिळण्यासाठी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित परवाना विभाग, आयुक्त पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर परवाना देतात. त्यासाठी काही शासकीय फी द्यावी लागते. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातून शस्त्र परवाना मिळण्याचे प्रमाण सध्या तरी अल्प आहे.

परवाना घेतलेल्या बंदुक, पिस्तूल च्या द्वारे कोणाला तरी धमकावणे, दहशत निर्माण करणे, हवेत गोळीबार करणे अशाप्रकारे काहीजण गैरवापर ही करतात हे भयानक वास्तव आहे. असे प्रकार घडूनही त्या लोकांचा शस्त्र परवाना रद्द होत नाही असे वास्तव आहे.

हल्ली शस्त्र सांभाळणे महत्वाचे आहे ते दुसऱ्यांना घातक ठरते आहे असे राज्यात दिसते आहे.

ज्याच्या नावाने शस्त्र परवाना आहे त्याने ते कोणाकडे देऊ नये त्या शस्त्राद्वारे इतराने गुन्हा केल्यास अडचण निर्माण होते . शस्त्र सांभाळणे जेवढे सोपे, शोभेचे वाटते तेवढे महत्वाचे आहे.

शस्त्र परवाना ज्यांच्या नावे आहे, त्यांनी सुरक्षितपणे शस्त्र सांभाळणे आवश्यक आहे .निवडणुकांच्या वेळेला परवानाधारी शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करावे लागते. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा ते पोलिसांकडून परत घ्यावे लागते.

शस्त्र परवाने आणखी कडक करण्याची गरज आहे

जिल्ह्यात तसेच पिंपरी- चिंचवड आयुक्तालयात शस्त्र परवाना धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परवाने घेणाऱ्यांमध्ये बहुतांश लोकं हे उद्योजक, राजकीय नेते,व्यावसायिक, काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकंही आहेत. ज्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत त्यांनाही शस्त्रपरवाना काही चिरीमिरी देऊन मिळतो असेही बोलले जाते.

शस्त्र परवाना मिळविण्यासाठी असलेली प्रक्रिया किचकट वाटतं असली तरी नियम अधिक कडक करणे गरजेचे आहे. ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच परवाना मिळणे गरजेचे आहे. मात्र काहीजण हौस म्हणून तसेच शोभेची वस्तु कमरेला पाहिजे. स्वतःचा दरारा वाढला पाहिजे लोकात भीती, दहशत निर्माण झाली पाहिजे म्हणून परवाना घेतात. याकडे परवाने देणाऱ्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीत सुमारे पंच्याहत्तर लोकांकडे शस्त्र परवाने आहेत. चाकण,महाळुंगे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे शस्त्र परवाने आहेत. हे शस्त्र परवाने काही राजकीय नेते,कार्यकर्ते, व्यावसायिक,उद्योजक तसेच ज्यांच्यावर यापूर्वी हल्ले झालेले आहेत. ज्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे अशा लोकांकडे आहेत.

पिस्तूल, बंदूक स्वसंरक्षणासाठी वापरताना त्यांना गोळ्याच्याही मर्यादा देण्यात आलेल्या आहेत. शस्त्र हाताळणे व त्या गोळ्यांचा वापर करणे महत्त्वाचे असते. हाताळताना तसेच गोळ्यांचा वापर करताना तो हवेत झाला पाहिजे.निरपराध कोणत्याही व्यक्तीला इजा पोचता कामा नये असे नियम आहेत.

शस्त्र परवानाधारकांचे पिस्तूल, बंदूक निवडणुकीच्या काळात पोलीस ठाण्यामध्ये जमा केल्या जातात. निवडणुकांमध्ये त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी जमा केल्या जातात.निवडणुका झाल्यानंतर पुन्हा त्या दिल्या जातात. परवानगी देताना अनेक नियम पाळले जातात. त्याच्या कुटुंबातील त्याची पत्नी, मुले तसेच शेजारच्यांची एनओसी घेतली जाते. त्याचा स्वभाव कसा आहे त्याचा स्वभाव रागीट आहे का कसा आहे हे पाहिले जाते.

त्यानंतर शस्त्र परवाना साठी पोलिसांकडून अहवाल दिला जातो.त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत का? ही परिस्थिती पाहिली जाते.शस्त्र परवानाधारकाबाबत काही गुन्हे त्याच्यावर दाखल झाले तर परवानाधारक शस्त्र जप्त केले जाते. चाकण पोलीस ठाण्याच्या वतीने शस्त्र परवानाधारकांची वेळोवेळी बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या जातात.असे चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.

राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले की, खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्तर शस्त्रपरवाना धारक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com