चाकण पोलिसांनी दोन जणांकडून केल्या आठ लाखाच्या पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त

आरोपीकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या चोरी केलेल्या पंधरा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
chakan
chakansakal

चाकण : चाकण पोलिसांच्या वाहनचोरी विशेष तपास पथकाकडून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीची चोरी करणारे आरोपी योगेश तुकाराम देवकर (वय -30 वर्ष )दत्तात्रय गंगाराम गाडेबैल (वय -26 वर्ष,दोघे,रा.कवठेयमाई ता. शिरूर जि. पुणे) यांना अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या चोरी केलेल्या पंधरा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,"

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत चाकण परिसर हा औद्योगिक वसाहतीचा असल्याने तसेच वाढती रहदारी असल्याने अज्ञात व्यक्तीकडून दुचाकीची चोरी होत असल्याने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी दुचाकी चोरी बाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,विक्रम गायकवाड,पोलीस हवालदार संदीप सोनवणे, पोलीस शिपाई संदीप गंगावणे ,पोलीस हवालदार राजू जाधव, हनुमंत कांबळे, पोलीस नाईक निखिल शेटे, पोलीस शिपाई नितीन गुंजाळ,सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी, विवेक सानप, प्रतीक चव्हाण, अरुण शिंदे, महादेव बिक्कड, महिला पोलीस शिपाई माधुरी कचाटे यांनी दुचाकी चोरीचे तांत्रिक विश्लेषण केले व शंभरच्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासले.चाकण पोलीस पाण्याच्या हद्दीत दुचाकी चोऱ्या करणारे योगेश देवकर व दत्तात्रय गाडेबैल दोन्ही रा.कवठेयेमाई ता. शिरूर जि. पुणे हे दोघे निष्पन्न झाले.

आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे तपास केला असता दत्तात्रय गाडेबैल व योगेश देवकर यांनी यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाण्याच्या व इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या एकूण पंधरा दुचाकी काढून दिल्या असून त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी कडून नऊ गुन्ह्यांची उकल झालेली आहे. जप्त केलेल्या दुचाकींच्या इंजिन नंबर व चॅसी नंबरच्या आधारे माहिती घेऊन मुळ मालक शोधत आहोत. असे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.

चाकण, ता. खेड :येथील पोलिसांच्या वाहन चोरी विशेष पथकाने आरोपीनी चोरी केलेल्या दुचाकी त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी,कर्मचारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com