चाकण ते पुरंदर विमानतळ स्वतंत्र महामार्ग!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

पुणे - चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव रद्द करीत ऐनवेळेस विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची चाकणच्या नागरिकांची मानसिकता होऊ नये, यासाठी पुरंदर विमानतळ थेट चाकणला जोडण्यासाठी ‘स्वतंत्र महामार्ग’ बनविण्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्यानुसार या प्रस्तावित महामार्गाचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अनेक वर्षांपासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव प्रलंबित होता. सुरवातीला चाकण येथे औद्योगिकदृष्ट्या आणि शहराच्या जवळचे ठिकाण म्हणून विमानतळ उभारणीस राज्य सरकारने पहिली पसंती दिली होती; परंतु ऐनवेळेस पुरंदर येथे विमानतळ उभारता येणे शक्‍य असल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून (एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडिया) निश्‍चित करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारकडून चाकण विमानतळाला ‘रेड सिग्नल’ देत पुरंदर विमानतळाला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. पुरंदर विमानतळासाठीचे भूसंपादन आणि पुढील प्रक्रियेला आता गती मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘चाकण ते पुरंदर विमानतळ’ असा स्वतंत्र महामार्ग करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी उच्चस्तरीय बैठकीत सूचना केल्या होत्या. 

पाच महामार्गांची ‘कनेक्‍टिव्हिटी’
प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या जवळून दोन्ही प्रस्तावित रिंगरोड जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या रिंगरोडला ‘चाकण ते पुरंदर महामार्ग’ जोडण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिंगरोडला हा महामार्ग जोडल्यास पुरंदर विमानतळाला पाच महामार्गांची ‘कनेक्‍टिव्हिटी’ मिळू शकणार आहे.

Web Title: chakan to purandar airport independent highway