चाकण हिंसाचाराचा तपास एसआयटीकडे

Chakan-Violence
Chakan-Violence

चाकण - चाकण (ता. खेड) येथे मराठा आंदोलनादरम्यान ३० जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराचा तपास एसआयटी करणार आहे. पुढील आठवड्यापासून एसआयटी काम सुरू करणार आहे, अशी माहिती  पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

हिंसाचारात सरकारी वाहने, बस जाळण्यात आल्या होत्या. तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. चाकण बस स्थानकातील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. 

पोलिस ठाण्यावर समाजकंटक चालून गेले होते. त्या वेळी समाजकंटकांनी पोलिस ठाण्यासमोरील पोलिसांची वाहने पेटवून दिली होती. काही वाहनांवर दगड टाकले होते. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी पाच हजार जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यातील तीसवर आरोपी पकडण्यात आले होते. त्यातील आरोपींना जामीनही मिळाले होते.

खरे आरोपी कोण?
रिपब्लिकन पक्षाचे संतोष डोळस, चाकणचे स्वीकृत नगरसेवक राहुल कांडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार दिलीप मोहिते हे हिंसाचाराचे खरे सूत्रधार आहेत, असा आरोप केला होता. तर माजी आमदार मोहिते यांनी राहुल कांडगे व इतर हिंसाचाराचे सूत्रधार आहेत, असा आरोप केला आहे. हिंसाचार करणाऱ्यांनी पोलिस ठाण्यासमोरील पोलिसांची वाहने पेटविली, त्या वाहनांच्या शेजारी कांडगे याची आलिशान गाडी पोलिसांनी एका गुन्ह्यात जप्त केली होती, ती गाडी तेथे लावण्यात आली होती. कांडगे यांनी गाडी पेटेल म्हणून तेथून हलविली. गाडी जप्त असताना कांडगे यांनी ती कशी हलविली याचीही चौकशी झाली पाहिजे, असे माजी आमदार मोहिते यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com