बालेवाडीत चेंबर तुंबून  मैलामिश्रित पाणी रस्त्यावर 

शीतल बर्गे 
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पुणे ः येथील मोझे महाविद्यालयाकडून बालेवाडी गावाकडे जात असताना मुख्य रस्त्याच्या बाजूलाच मैला पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे चेंबर तुंबून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर आले आहे. परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून योग्य ती उपाययोजना करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. 

श्री बालाजी एंटरप्राइजेसच्या परिसरात खोलगट भाग असल्याने आधीच या ठिकाणी पावसाचे पाणी साठले होते आणि त्यातच हे चेंबर तुंबल्याने त्याचे नाल्यात रूपांतर झाले आहे. या भागातून हे पाणी वाहून पुन्हा मुख्य रस्त्यावर आले असल्याने येता जाता वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर हे घाणीचे पाणी उडत आहे. 

पाणी तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, येता-जाताना नागरिकांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. येथून जवळच सोहम ओलिव्हा, अरविंद इनक्‍लेव, स्वप्न शिल्प या सोसायट्या असून, येथूनच सोसायटीत रस्ता जातो. येथेही पाणी साठल्याने सभासदांनी शेजारच्या जागेतून तात्पुरती ये-जा सुरू केली आहे. साठलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास पोषक जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अनेक साथीचे आजार पसरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याबाबत गांभीर्याने विचार करुन महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत. 
""मी एक ज्येष्ठ नागरिक असून, स्वप्न शिल्प इमारतीत राहतो. आमच्या नेहमीच्या रस्त्यावरच कमरेएवढे पाणी साचल्यामुळे आम्ही येथून जाऊच शकत नाही. यामुळे शेजारच्या प्लॉटमधून सध्या ये-जा करीत आहेत. आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.'' - रावसाहेब सोनवणे, स्थानिक रहिवासी 

""आरोग्य निरीक्षकासमवेत मी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. हा प्रश्‍न का निर्माण झाला आहे, याची शहानिशा करून आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येईल.'' - अस्मिता घोगरे, कनिष्ठ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chamber trunk on the dirt road in Balewadi