हडपसरमध्ये भरकटलेल्या सांबाराचा मृत्यू

संदिप जगदाळे
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

हडपसर : भर नागरी वस्तीमध्ये आलेल्या सांबाराला हडपसर अग्निशामक विभाग व कात्रज येथील प्राण्यांच्या अनाथलायातील रेस्क्यू टिमने मोठ्या शर्तीने पकडले. मात्र जखमी झालेल्या सांबरावरती उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

नागरी वस्तीमध्ये हे सांबर आल्याने नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्कयू टिमने त्याला पकडले होते. महात्मा फुले वसाहत येथून जाणाऱ्या कोरडया नवीन मुळा-मुठा कालव्यात हे सांबर नागरिकांना आढळून आले. वन्यप्राणी पाहून नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.

दरम्यान परिसरातील कुत्री त्याचा पाठलाग करत होती. त्यामुळे सांबर सैरभेर झाले होते. हडपसर पोलिस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र चार फूट उचीचे धिप्पाड सांबर कसे पकडायचे हा प्रश्न त्यांना पडला. दरम्यान घटनास्थळी कात्रज येथील प्राण्यांच्या अनाथलयाची रेस्क्यू टिम पोहचली. त्यावेळी ते सांबर तेथील कालव्यालगतच्या उद्यानात गेले होते. रेस्क्यू टिमने त्याच्या उजव्या पायावर डाट मारून त्याला बेशुध्द करण्याच प्रयत्न केला. मात्र सैरभैर झालेले सांबर जास्तच चवताळले. कालव्या लगत असलेल्या तारेच्या कंपाउंडवर त्याचे तोंड आदळल्याने ते जखमी झाले. दरम्यान रेस्क्यू टिमने सांबर पळून जावू नये म्हणून जाळी लावली होती. जाळीमध्ये ते सांबर अडकले. त्यावेळी झडप मारून सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला अलगत पकडले. त्यानंतर प्राणी रूग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी कात्रज येथील प्राणी अनाथलयामध्ये रवाना करण्यात आले.  

कात्रज येथील प्राणी अनाथलयाचे अॅनिमल किपर महेश देशपांडे म्हणाले, सांबर अनेक ठिकाणी जखमी झाले होते. त्याच्यावर आम्ही उपचार करत होतो. दरम्यान अकरा वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.

Web Title: chamois death in hadapsar