पुण्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

राज्यात बदलत असलेल्या वातावरणामुळे अनेक भागांत कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाच्या उघडीपीसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

पुणे - शहर आणि परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पुण्यात 1 जूनपासून 728.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडले, असा इशारा हवामान खात्याने मंगळवारी दिला. दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस पडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्या तुलनेत मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात जोर कमी झाला. पुढील दोन दिवसांत काही भागात पावसाच्या सरी पडतील, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात बदलत असलेल्या वातावरणामुळे अनेक भागांत कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाच्या उघडीपीसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सिंधुदुर्गातील मालवण येथे सर्वाधिक पाऊस पडला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानासह अधून-मधून ऊन पडत आहे. नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर इंदापूर, माढा, माळशिरस परिसरात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. त्यामुळे ओढे, नाले व शेतातून भरून वाहत होते. नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार परिसरात पावसाची उघडीप होती.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of rainfall in Pune