बारामती-इंदापूर राज्यमार्गावर मळीमिश्रीत पाण्यामुळे अपघाताचा धोका

road
road

वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता. इंदापूर) जवळील चिखलीफाटा येथे बारामती-इंदापूर राज्यमहामार्गावर मळीमिश्रत पाणी आल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वालचंदनगर जवळील खासगी कंपनी ठेकेदारच्या माध्यमातून मळीमिश्रित पाणी शेतामध्ये सोडत आहे. लासुर्णे जवळील बारामती-इंदापूर महामार्गालगत एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मळीमिश्रीत पाणी सोडण्यात आले आहे. शेतामध्ये जास्त पाणी झाल्यामुळे तसेच शेतामध्ये पाणी सोडत असताना टँकरमधील पाणी रस्त्यावर सांडल्यामुळे बारामती-इंदापूर राज्यमार्गावर मळीचे पाणी आले आहे. यामुळे रस्त्याचा काही भाग निसरता झाला असुन यावरुन दुचाकी व चारचाकी वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला असुन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अपघात टाळण्यासाठी संबधित ठेकेदारने रस्ता पाण्याने धुवून देण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.  

जास्त पाणी सोडल्यामुळे जलप्रदुषणाचा धोका
अनेक शेतकरी पडीक व क्षारपड जमीनीमध्ये मळीमिश्रित पाणी सोडत असतात. मात्र जमीनीमध्ये जास्त पाणी सोडल्यास जलप्रदूषण होण्याचा धोका असतो. गेल्या दोन दिवसापासुन चार एकर क्षेत्रामध्ये हजारो लिटर पाणी सोडल्यामुळे भविष्यात या परीसरातील विहिरींचे पाणी प्रदूषीत होण्याचा धोका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com