Chandni Chowk Bridge: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांचा 'फ्लो' वाढला; वाहतूक मात्र सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandni Chowk Bridge

Chandni Chowk Bridge: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांचा 'फ्लो' वाढला; वाहतूक मात्र सुरळीत

पिंपरी : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुन्या पुलाच्या पाडकामासाठी मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक उर्से टोल नाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवली आहे. यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांचा 'फ्लो' वाढला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नियोजन केले असल्याने या मार्गाने पुण्याकडे जाणारी वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे.

जड वाहनांना उर्से टोल नाक्यापासून शनिवारी रात्री आकारानंतर प्रवेश बंद केला. सुरुवातीला काही वेळ वेळातच वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या. मात्र, पोलिसांनी जड वाहने डाव्या बाजूच्या दोन लेनमध्ये उभी करून उरलेल्या एका लेनमधून हलकी वाहने पुढे सोडण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू केले.

काही वेळाने जड वाहनेही उर्से खिंडीतून तळेगाव दाभाडे येथील चाकण फाटा मार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सोडण्यास सुरुवात केली. येथून ही वाहने देहूरोड येथील सेंट्रल चौक मार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, पुणे मार्गे वाहने पुढे जात आहेत.

हेही वाचा: Chandni Chowk Bridge Demolition : अखेर पुण्यातील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त!

तर हलकी वाहने उर्से टोल नाक्यापासून पुढे सोडली जात आहेत. किवळे चौकापासून मात्र हलक्या वाहनांनीही मुंबई- बंगळुरु मार्गावर प्रवेश बंद केला आहे. येथून ही वाहतूक औंध- रावेत मार्गावर वळवली आहे. येथून ही वाहने रावेत, डांगे चौक मार्गे, रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरून औंध, शिवाजीनगरमार्गे इच्छितस्थळी जात आहेत.

दरम्यान, किवळेच्या पुढे काही छोट्या रस्त्यासह सेवा रस्त्यांवरून काही वाहने बंगळुरु मार्गावर येत आहेत. मात्र, ही वाहने पुन्हा वाकड नाका- भुजबळ चौक येथे अडवली जात आहेत. येथे बॅरिकेड्स उभारले आहेत. येथून डावीकडे वळून वाहने कस्पटे चौक, रक्षक चौक, मानकर चौक मार्गे पुण्याच्या दिशेने जात आहेत. दरम्यान, वाहन चालकांना पूर्वकल्पना असल्याने तसेच पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून योग्य नियोजन केल्याने पर्यायी मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

हेही वाचा: Chandani Chowk Bridge Demolished : इंजिनिअर्सचा अंदाज चुकला! PWDनं केलं होतं मजबूत काम

'त्यांना' वाहनाची प्रतीक्षा

हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याची कल्पना नसलेले काही प्रवासी ठिकठिकाणी वाहनाची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहेत. भूमकर चौक, भुजबळ चौक आदी ठिकाणी रस्त्यालगत काही प्रवासी वाहनाच्या प्रतिक्षेत बसलेले आहेत.

टॅग्स :TrafficChandni Chowk