चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांना ट्रॉफीज दिल्या पण निघाल्या चुकीच्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

पुण्यातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील शरदचंद्र सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा वेगळी आणि ट्रॉफीवर वेगळ्या परीक्षेचा उल्लेख असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी 'सकाळ' कडे फोन करुन नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज (ता. १५)  पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र  सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अशा नावाची चुकीची ट्रॉफीज वितरण करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. तसेच ट्रॉफीवर शैक्षणिक वर्ष  २०१८-१९ ऐवजी २०१७-१८ असा उल्लेख केला आहे. 

पुण्यातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील शरदचंद्र सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा वेगळी आणि ट्रॉफीवर वेगळ्या परीक्षेचा उल्लेख असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी 'सकाळ' कडे फोन करुन नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच प्रातिनिधिक सत्कार करुन पालकमंत्री गेल्यामुळे वास्तविक विद्यार्थ्यांना त्यांचे हस्ते सत्कार घ्यायचा होता. केवळ औपचारिकता म्हणून पुणे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याची चर्चा रंगली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil distribute trophies for students