Pune News : बाजीराव पेशवे पुतळ्याची चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत पेशवे प्रतिष्ठान लोकसहभागातून पुतळा उभारला जात आहे
chandrakant patil inspected bajirao peshwa statue pune marathi news
chandrakant patil inspected bajirao peshwa statue pune marathi newsSakal

खडकवासला : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मध्ये लोकसहभागातून थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारला जात आहे. त्यांची पाहणी आज शुक्रवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्येमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच बाजीराव पेशवे पुतळ्याच्या कामाप्रती समाधान व्यक्त केले.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून प्रबोधिनीमध्ये बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. याचे अनावरण देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पाटील यांनी ही पाहणी केली. प्रबोधिनीत महापालिकेने बसविलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

एअर मार्शल निवृत्त भूषण गोखले, पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुंदनकुमार साठे भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुतळा तयार करणारे शिल्पकार विपुल खटावकर, स्क्वाॅडन लीडर प्रकाश शिंदे, मेजर राहुल शुक्ला, कर्नल रमीनदर सिंग, युवा मोर्च्या क्रीडा आघाडीचे शहरप्रमुख प्रतीक खर्डेकर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, श्रीमंत बाजीराव पेशवे हे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तीमत्व होतं. त्यांनी केवळ युद्धभूमीवरच आपलं कौशल्य सिद्ध केले नाही. तर उत्तम प्रकारे प्रशासन सांभाळले. त्यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com