चंद्रकांत पाटील 'पार्ट टाईम' पालकमंत्री : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगलीत पूर आल्यावर तेथील दोन्ही पालकमंत्री गायब होते. 2005 ला पुर आला तेव्हा काँग्रेसचे पालकमंत्री तेथे ठाण मांडून होते, लोकांना मदत केली. पण भाजपचे पालकमंत्री तेथे फिरकले नाहीत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आहे, पुण्याचे पालकमंत्री आहे. ते कोल्हापूरचे पार्ट टाईम पालकमंत्री आहेत.

पुणे :पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या पुराला काँग्रेस जबाबदार असल्याच आरोप केला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''कोल्हापूर आणि सांगलीत पूर आल्यावर तेथील दोन्ही पालकमंत्री गायब होते. 2005 ला पुर आला तेव्हा काँग्रेसचे पालकमंत्री तेथे ठाण मांडून होते, लोकांना मदत केली. पण भाजपचे पालकमंत्री तेथे फिरकले नाहीत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आहे, पुण्याचे पालकमंत्री आहे. ते कोल्हापूरचे पार्ट टाईम पालकमंत्री आहेत.

​काँग्रेसवर टीका करण्याऐवजी ते महापुराच्या काळात कुठे होते याचे उत्तर द्या? असा जाब पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. कोयना धरणाच्या पुरावर नियंत्रण करण्यासाठी अराजकीय उच्च स्तरीय तांत्रिक समिती नेमणे आवश्‍यक आहे. त्यामधील तज्ज्ञ पूर नियंत्रणासाठी अभ्यास करून संकट टाळू शकतात'', असे चव्हाण यांनी सांगितले. 

पुण्यात कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष माही आमदार रमेश बागवे, मोहन जोशी आदी यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil is Part Time Guardian Minister said Prithviraj Chavan