राहुल मंदिरात जाऊ लागले, केजरीवाल हनुमान भक्त झाले; चंद्रकांत पाटील यांचा टोला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

ज्यांची भूमिका आमच्याशी जुळते त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन जातो.  काँग्रेसही बदलायला लागली. प्रियांका देवळात जायला लागल्या. केजरीवाल हनुमान चाळीसा म्हणू लागले. राहुल मंदिरात जाऊ लागले. आरएसएस खुश होईल. हिंदू हा केवळ धर्म नाही, संस्कृती आहे. CAAलाही समर्थन द्यावे."'

पुणे : राज ठाकरे यांच्या भूमिकेचेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. आज पुण्यात त्याबाबत बोलताना ते म्हणाले की,''त्यांनी डोके वर काढणाऱ्या शक्तींना इशारा दिलामात्र, परप्रांतीय लोक, गरीब त्यांच्याबद्दल भूमिका बदलावी.ज्यांची भूमिका आमच्याशी जुळतेत्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन जातो. काँग्रेसही बदलायला लागली.प्रियांका देवळात जायला लागल्या. केजरीवाल हनुमान चाळीसा म्हणू लागले. राहुल मंदिरात जाऊ लागले. आरएसएस खुश होईल. हिंदू हा केवळ धर्म नाही, संस्कृती आहे.CAAलाही समर्थन द्यावे."'

अजित पवारांनी दिला बारामती नगरपालिकेलाबूस्टर डोस

तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देण्यास आमचा विरोध नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले ''चांगली संस्था आहे त्यामुळे जागा द्यायला विरोध नाही. जागा दिलीच पाहिजेपण, पद्धत चुकीचीआहे. कोणतेही महाराष्ट्रातील फाईल ही आधी विधी विभागाने मान्यता दिली पाहिजे मग, अर्थविभाग विभागाने मान्यता दिली पाहिजे मग ती फाईलकॅबिनेटमध्ये आणायची कॅबिनेटमध्ये नका आणू तेवढे अधिकार तुम्हाला आहेत पण, तुम्ही अर्थविभागालाही दाखवत नाही मग अर्थविभागाला पटवून द्या, आमचा विरोध नाही. नियम ,पद्धती डावलून देतायेत म्हणून विरोध केला जात आहे"

अन् बारामती नगरपालिकेचे वातावरणच बदलून गेले...

'शिवाजीनगर, विद्यापीठ रस्त्यावरील तीनही पुल चुकले''असे अजित पवार म्हटले आहेत. त्याबाबत ''अजित पवार सत्तेत आता आले असतील, पण त्यांना कळायला लागले तसे आमदार झाले. त्यामुळे गेल्या 5 वर्षात विरोधी पक्ष म्हणून सतर्क राहायला पाहिजे होते. सतर्कपणे याला विरोध करायचा होता. पण उशीरा का असेना अजित पवारांना हे लक्षात आले असेल तर चौकशी करावी, करावाई करावी.''असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

-ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंगणघाट प्राध्यापक महिलेला श्रद्धांजली यांनी चंद्रकांत पाटील यांनी वाहिली. याबाबत बोलताना ते म्हणाले,''मागील सरकारच्या काळात गुन्ह्यात शिक्षा लागण्याचे प्रमाण वाढले होते, ते आता या सरकारच्या काळात कमी झाले आहे. शिक्षा होण्याचे प्रमाणे वाढले पाहिजे याबाबत मुख्यमंत्री उद्धवजीना भेटून याबाबत चर्चा करणार आहे.''

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे►क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant patil statement on Rahul Gandhi and Arvind Kejariwal