esakal | चंद्रकांत पाटील म्हणतात, 'दुसऱ्या घड्याळाकडे लक्ष दिल्यास माझेच बारा वाजतील'
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील म्हणतात, 'दुसऱ्या घड्याळाकडे लक्ष दिल्यास माझेच बारा वाजतील'

मोदी सरकारने अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी केल्या असल्याचे सुतोवाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भूगाव (ता. मुळशी) येथे केले.

चंद्रकांत पाटील म्हणतात, 'दुसऱ्या घड्याळाकडे लक्ष दिल्यास माझेच बारा वाजतील'

sakal_logo
By
राजेंद्र मारणे

भुकूम : पंतप्रधान मोदींनी सहा वर्षात शेतकरींना समृध्दी, सुख व सुरक्षितता मिळावी यासाठी प्रयत्न केले. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. मोदी सरकारने अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी केल्या असल्याचे सुतोवाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भूगाव (ता. मुळशी) येथे केले.

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदर्शनवरून प्रसरीत नऊ कोटी शेतकऱ्यांना 18 कोटी रूपये प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अतंर्गत कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री बाळा भेगडे, माधव भंडारी, जालिंदर कामठे, नगरसेवक किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, अमोल बालवडकर, अल्पना वरपे, श्रध्दा प्रभुणे, तालुका महिला अध्यक्षा वैशाली सणस उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ''शेतकऱ्यांचे खरे दु:ख मोदींने ओळखले. त्यामुळे शेतीचा पोत सुधारणे, धरणांचे अर्धवट प्रकल्प पूर्ण करणे, पीक विम्यात सुधारणा करणे, सहा हजार देऊन सावकारकी बंद केली, खते प्रत्येकाला मिळतील याबाबत कार्यवाही केली.

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

यावेळी खासदार बापट म्हणाले, ''शेतकरी आंदोलनात कम्यूनिष्ट पक्षांचा पुढाकार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या आवाहनाला बळी पडत आहेत. सोनिया गांधी यांनी तुम्हाला कृषी खात्याचे काम करून दिले नाही.''

घडाळ्याकडे लक्ष द्या...चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना पंतप्रधानांचा कार्यक्रम प्रसारीत होण्याची वेळ झाली होती. त्यावेळी पाटील म्हणाले, ''माझे घड्याळाकडे लक्ष आहे. त्यावेळी बापट म्हणाले, कोणत्या घड्याळाकडे लक्ष आहे. पाटील म्हणाले, माझ्या हातातील घड्याळाकडे माझे लक्ष आहे. दुसऱ्या घड्याळाकडे लक्ष दिल्यास माझेच बारा वाजतील. यावर सर्वत्र जोरदार हशा पिकला.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image
go to top