esakal | जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप
sakal

बोलून बातमी शोधा

khambale lake 1.jpg

सायंकाळी परिसरात जनावरे चारणाऱ्या काही शेतकऱ्यांनी तिघींचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितले. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला. माजी सरपंच विजय गायकवाड यांनी याबाबत वावी पोलिस ठाण्यात माहिती दिली. काय घडले नेमके?

जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (जि.नाशिक) : सायंकाळी परिसरात जनावरे चारणाऱ्या काही शेतकऱ्यांनी तिघींचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितले. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला. माजी सरपंच विजय गायकवाड यांनी याबाबत वावी पोलिस ठाण्यात माहिती दिली. काय घडले नेमके?

शेतकरी अन् गावकऱ्यांचा उडाला थरकाप

सायंकाळी परिसरात जनावरे चारणाऱ्या काही शेतकऱ्यांनी तिघींचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितले. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला. माजी सरपंच विजय गायकवाड यांनी याबाबत वावी पोलिस ठाण्यात माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी हलविण्यात आले. दरम्यान, या विवाहितेचे माहेर नगरसूल (ता. येवला) येथील असून, तिचे नातेवाईक उशिरा दोडी रुग्णालयात पोचले. मनीषाने पोटच्या गोळ्यांना सोबत घेऊन आत्महत्या का केली असावी, याबाबत पोलिसांकडे उशिरापर्यंत कोणतीही माहिती नव्हती.  

हेही वाचा - शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान! टार्गेट सप्तपदीचा मुहूर्त

सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस

पिंपरवाडी (यशवंतनगर) (ता. सिन्नर) येथील विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्या बालिकांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (ता. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 
मनीषा अनिल गायकवाड (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिने आपल्या मुली ओवी (वय ३ वर्षे) व अन्वी (चार महिने) यांना सोबत घेऊन बाबासाहेब हाडोळे यांच्या गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा - निनावी पत्रावरून पोलीसांनी लावला शोध, हाती लागली धक्कादायक माहिती

go to top