Dhangar Reservation: शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारामतीत सकल धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा घेणार - चंद्रकांत वाघमोडे

सकल धनगर समाजाच्या आंदोलनात काही समाज बांधव मेंढ्यांच्या सोबत सहभागी
chandrakant waghmode will organize dhangar community melava for dhangar reservation politics
chandrakant waghmode will organize dhangar community melava for dhangar reservation politicsSakal

पारगाव : धनगर समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये एसटी(अनुसुचित जमाती) मध्ये दिलेल्या आरक्षणाची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी करत यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच बारामती येथे सकल धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याची माहिती सकल धनगर समाजाचा नेते चंद्रकांत वाघमोडे यांनी दिली.

पारगाव ता. आंबेगाव येथे आज रविवारी आंबेगाव तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज एसटी(अनुसुचित जमाती) चे आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी रांजणगाव ओझर

या अष्टविनायक महामार्गावर रास्तारोको करण्यात आला होता यावेळी चंद्रकांत वाघमोडे बोलत होते यावेळी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता महिलांची उपस्थित लक्षणीय होती.

येथील राजमाता अहिल्यादेवी चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली कारखाना चौकात रास्तारोको करण्यात आला आंदोलनाची सांगता मुक्तादेवी मंदिरासमोरील पटांगणात झालेल्या सभेने झाली. सभेच्या सुरवातील महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

चंद्रकांत वाघमोडे पुढे म्हणाले मी बारामती येथे १३ दिवसाचे उपोषण केले त्यावेळी शासनाने एक जीआर काढून समिती तयार केली व धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश व्हावा असा उल्लेख केला आहे परंतु धनगर समाजाला घटनेनेच आरक्षण दिलेले असून फक्त त्याची अमंलबजावणी होणे बाकी आहे

ती तातडीने करावी अशी मागणी करून जुन्नर आंबेगाव मधील लोकप्रतिनिधी आदिवासी बांधवांच्या आरक्षण हक्कासाठी त्यांच्या व्यासपीठावर जातात तर धनगर बांधवांच्या हक्कासाठी आमच्या व्यासपीठावर का येत नाही

असा सवाल उपस्थित केला धनगर आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा धनगर समाज २०२४ च्या निवडणुकीत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी अहिल्यादेवी धर्मशाळा (आळंदी) अध्यक्ष पै. जयवंतराव कवितके यांच्यासह आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सकल धनगर समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. सकल धनगर समाजाच्या आंदोलनात काही समाज बांधव मेंढ्यांच्या सोबत सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com