Chadrarao Tavare : पुरंदर, इंदापूर तालुक्याप्रमाणे बारामतीत भाजप नेतेमंडळींचे म्हणणे ऐका

बारामती लोकसभा निवडणूक निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचे राजकिय प्रश्न समजून घेतले.
chandrarao tavare and ranjan tavare
chandrarao tavare and ranjan tavaresakal

माळेगाव - बारामती लोकसभा निवडणूक निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचे राजकिय प्रश्न समजून घेतले. त्यांचा महायुतीमध्ये मेळही बसविला, तसा मेळ बारामतीमध्येही बसविण्यासाठी आम्हा भाजप कार्य़कर्त्यांचे म्हणणे ऐका व स्वतंत्र वेळ द्या, अशी हाक ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री फडणविस यांना दिली आहे.

आमच्या पोटाचं दुखणं वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याशिवाय ते लोक आम्हाला औषध कसे देणार, असाही खोचक सवाल तावरे यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

बारामती लोकसभा मतदार संघाची पंचवार्षिक निवडणूक यंदा पवार कुटुंबियांनी प्रतिष्ठेची केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र चुल मांडत आपल्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केले, तर प्रतिस्पर्धी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे करून कमालीची चुरस निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोन्ही नेत्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात बेरजेचे समिकरण जळविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू केले आहेत. पवारसाहेबांनी पुर्वीचे विरोधक व भोरच्या थोपटे कुटुंबासह अनेकांना आपलेसे कले,  तर महायुतीची बाजू भक्कम होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार व देवेंद्र फडणविस यांनी महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न यशस्वी केला.

पुरंदरचे विजय शिवतारे यांची समजूत काढली, तशीच काहीशी रणनिती संबंधित नेत्यांनी इंदापूरात आवलंबली. तेथेही हर्षवर्धन पाटील यांची व त्यांच्या कार्य़कर्त्यांची नाराजी काढली. तोच धागा पकडत बारामतीत भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांनी उपमुखमंत्री फडणविसांसमोर काही प्रश्न उपस्थित केल्याची माहिती आज पुढे आली.

याबाबत तावरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, `बारामतीमध्ये भाजपचे काम करताना आम्हालाही काही अडचणी येत आहेत. या गोष्टीची कल्पना वरिष्ठ नेते फडणविस साहेबांना दिली पाहिजे, अन्यथा आमच्या पोटाच दुखणं वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याशिवाय ते लोक आम्हाला औषध कसे देणार. शुक्रवार (ता.५) रोजी आम्ही इंदापूरच्या सभेला हजेरी लावली खरी, परंतु तेथे घाईगडबडीत फडणविस साहेबांचे पाहिजे तेवढे बोलणे झाले नाही.

शेवटी पुरंदरचे माजी मंत्री शिवतरे आणि इंदापूरचे माजी मंत्री पाटील यांचे राजकिय प्रश्न समजून घेतले आणि मेळही बसविला, तसा फडणविस साहेबांनी बारामतीचासुद्धा मेळ बसविला पाहिजे. त्यानुसार मी व रंजन तावरे आदी भाजपच्या कार्य़कर्त्यांनी फडणविससाहेबांची स्वतंत्र वेळ मागितली आहे.`

अजितदादांचा साखर पट्ट्यातील भाजपच्या नेतेमंडळींशी संपर्क झाला का, असे विचारले असता चंद्रराव तावरे म्हणाले,` हो अजितदादांनी आणि सुनेत्रा पवार यांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांच्यामध्ये अधिक काही बोलने झाले ते मला सांगता येणार नाही, परंतु अजितदादांनी आमचे नेते फडणविससाहेबांची स्वतंत्र बैठक घडवून देतो असे सांगितल्याचे मला समजले आहे.`

अजितदादांचे कट्टर विरोधक व्यासपिठावर येणार का..

बारामतीत अजित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून भाजप नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांची ओळख आहे. परंतु अजित पवार यांचा राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आणि तालुक्यातील राजकारण पुर्णतः बदलले. महायुतीचा धर्म विचारात घेता बारामतीत भाजप विचाराची तावरे मंडळी मनापासून राष्ट्रवादीच्या व्यासपिठावर येतात का? हा खरा प्रश्न बारामतीत उत्सूकतेचा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com