चंद्रशेखर नगरकर यांनी साकारले भातोडीच्या रणसंग्रामाचे शिल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrasekhar Nagarkar from Sinhagad Road area has created a moving sculpture of Bhatodis battle 2.jpg

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाट्याचे रहिवासी चंद्रशेखर नगरकर यांनी गेल्या महिन्याभरापासून हा रणसंग्राम उभा केला आहे. नगर शहरापासून 10-12 किलोमीटर अंतरावरील भातोडी गावात शहाजीराजे भोसले आणि मोगल-आदिलशाही यांच्यात झालेले युद्ध भातोडीचे युद्ध म्हणून ओळखले जाते.

चंद्रशेखर नगरकर यांनी साकारले भातोडीच्या रणसंग्रामाचे शिल्प

पुणे : दिवाळीत गड किल्यांचे शिल्प साकारायची लाहणग्यांमध्ये चढाओढ असते. आपला जाज्वल्य इतिहासाची अनुभूती त्यांना व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. लहानग्यांच्या या उपक्रमात कुटुंबातील इतर सदस्यांना सहभागी होताना आपण पाहिले असेल. अशाच एका अवलियाने लहानग्यांसाठी चक्क भातोडीच्या रणसंग्रमाचे हलते शिल्प साकारले आहे.  

हे ही वाचा : हेरॉइनची विक्री करणा-या वडील आणि मुलाला दहा वर्ष तुरुंगवास

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाट्याचे रहिवासी चंद्रशेखर नगरकर यांनी गेल्या महिन्याभरापासून हा रणसंग्राम उभा केला आहे. नगर शहरापासून 10-12 किलोमीटर अंतरावरील भातोडी गावात शहाजीराजे भोसले आणि मोगल-आदिलशाही यांच्यात झालेले युद्ध भातोडीचे युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धाचा हलता देखावा नगरकर यांनी साकारला आहे. यामध्ये भातोडी गाव, धरण, नगरचा किल्ला आदी साकारण्यात आले आहे. भातोडीचा हा देखावा सर्वांसाठी खुला असल्याचे नगरकर यांनी सांगितले. त्यांच्या मधुकोष अपार्टमेंटच्या रहिवाशांना ते दरवर्षी हा देखावा दाखवतात. मूलतः कंपनी सेक्रेटरी असलेले नगरकर छंद म्हणून असे शिल्प साकारतात. 

हे ही वाचा : गेली आठ महिने आईपासून दुरावलेली चिमुकली आता तिच्यासोबत करणार दिवाळी साजरी

भातोडीच्या देखाव्यात काय पहाल?
 
देखाव्यातील नगरचा किल्ला हुबेहूब साकारण्यात आला असून, भातोडी गावाचे संपूर्ण चित्रण त्यात करण्यात आले आहे. कोट असलेले नृसिंह मंदिर, चावडी, चुलीवर भाकरी करणारी आई, अंबारी, सैनिक आदींचे छोटी शिल्पे पाहण्यासारखी आहे. भातोडीचे धरण आणि युद्धानंतर नदीच्या किनाऱ्याचे दृष्य. 

काय आहे भातोडीचे युद्ध
 
1624 च्या ऑक्‍टोबर महिन्यात निजामशाही विरुद्ध मोगल आणि आदिलशहा यांच्या संयुक्त सैन्याचे युद्ध झाले. निजामशाहीच्या वतीने सरदार असलेले शहाजीराजे भोसले यांनी नेतृत्व केले होते. निजामशाहीकडे असलेल्या 40 हजार सैन्यापैकी 30 हजार सैन्य शहाजीराजांसोबत युद्धासाठी गेले होते. तर मोगल  आदिलशहाच संयुक्त सैन्यच 80 हजाराच्या जवळ होते. शहाजीराजांचे ज्येष्ठ सहकारी आणि निजामशाहीचे सरदार मलिक अंबर यांचे वय 80 वर्षांचे असल्यामुळे युद्धाची जबाबदारी शहाजीराजांवर आली.

मलिक अंबरने भातोडी नदीवर धरण बांधले होते. त्यामुळे त्यापुढील नदीचे पात्र रिकामे होते. या रिकाम्या जागेतच मोगल आणि आदिलशाहाच्या सैन्याने छावणीचा तळ ठोकला होता. शहाजीराजांनी रातोरात भातोडीचे धरण फोडले आणि शत्रूच्या 80 हजार सैन्याची छावणी वाहून गेली. तसेच त्यांचा दारूगोळा आणि सामानाचे प्रचंड नुकसान झाले. पर्यायाने या युद्धात शहाजीराजे जिंकले. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top