

PMC Election rescheduled
Sakal
पुणे : निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला होता. त्यामध्ये ६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करावी, त्यानंतर त्यावर हरकती सूचना मागविणे, योग्य हरकतींची दखल घेऊन मतदार यादी मध्ये बदल करणे, त्यानंतर मतदार केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करणे असा कार्यक्रम जाहीर केलेला होता. यामध्ये १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार होती.