पुणेकरांनो बाहेर पडताय, वाहतूकीत आज असा आहे बदल...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधीत रस्त्यावरील वाहतूकीत बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक विभागाने केले आहे. 

पुणे : शहरामधील विविध संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधीत रस्त्यावरील वाहतूकीत बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक विभागाने केले आहे. 

वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयापासून सकाळी साडे दहा वाजता एका संघटनेचा मोर्चा निघणार आहे. वाकडेवाडी, अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), मालधक्का चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबरोबरच दुसऱ्या संघटनांचा मोर्चा सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास लालमहल येथून फडके हौद चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येईल. तसेच आणखी काही संघटनांचा मोर्चा दुपारी दोन वाजता सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून सुरू होईल.

JNU Attack:जेएनयूच्या आंदोलनात उतरली दीपिका; जयभीमच्या घोषणा सुरू असतानाच आगमन

त्यानंतर हा मोर्चा पुरम चौक, बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मित्र मंडळ येथून दारुवाला पूल, नरपतगिरी चौक, मालधक्का चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल. त्यादृष्टीने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असेही वाहतुक शाखेने आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the change in transport of Pune today