Pune Traffic Update : मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत आज बदल

शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील मध्य भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शहरातील काही रस्ते सोमवारी (ता. १९) सकाळी सातपासून वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
Pune Traffic Update
Pune Traffic Updatesakal

शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील मध्य भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शहरातील काही रस्ते सोमवारी (ता. १९) सकाळी सातपासून वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

या पर्यायी मार्गांचा करा वापर

  • जिजामाता चौक येथून शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज मार्गाने खंडोजीबाबा चौक टिळक चौक ते टिळक रस्त्याने जावे

  • दारूवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून वाहनचालकांना इच्छित स्थळी जाता येईल

  • केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.

  • मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक पार करेपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक समर्थ विभाग हद्दीतून वळविण्यात येईल

  • पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालक पूरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रस्त्याने जातील

  • मिरवणुका सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजाकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे जातील

  • मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरून बालगंधर्व बाजूकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे जातील

  • मिरवणुका गाडगीळ पुतळा पार करेपर्यंत वाहनांना शनिवार वाड्याकडे जाता येणार नाही. या वाहनचालकांनी कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पूल ते बालगंधर्व, टिळक पूलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे जाता येईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com