पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल 

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमतेला चालना मिळावी, यासाठी अभ्यासक्रमात आवश्‍यक ते बदल करण्यात आले असून, या अभ्यासक्रमासाठी "क्रेडिट सिस्टिम' आहे. 

विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत नव्या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली. बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, एम.ए, एम.कॉम, एम.एस्सी त्याबरोबरच बीबीए आणि बीबीए (इंटरनॅशनल बिझनेस), (कॉमप्युटर ऍप्लिकेशन) यासाठी नवा अभ्यासक्रम आहे. समाज आणि औद्यागिक क्षेत्राशी विद्यार्थी कसे जोडले जातील, तसेच आवश्‍यक ती कौशल्ये त्यांच्यात विकसित व्हावीत, यादृष्टीने अभ्यासक्रमात बदल केले आहेत. अभ्यासक्रमातील बदलांबरोबरच परीक्षापद्धतीतही बदल केला आहे. परीक्षेत गुणांकनासाठी केडिट सिस्टिम लागू असणार आहे. यामध्ये महाविद्यालयांमार्फत होणाऱ्या अंतर्गत मूल्यमापनाला महत्त्व असेल. नव्या पद्धतीमुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल. अंतर्गत मूल्यमापनासाठी तोंडी परीक्षा, प्रकल्प, अहवाल सादरीकरण, प्रश्‍नमंजूषा असे स्वरूप असेल. अभ्यासक्रम शिकविताना तो विद्यार्थ्यांना कितपत समजला, हे जाणून घेणारी नवी परीक्षा पद्धती असणार आहे. ज्ञान, अध्यापन, ऍप्टीट्यूड आणि ऍप्लिकेशन या मुद्‌द्‌यांना धरून नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता विकसित होणे अपेक्षित आहे, हे डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमाची आखणी केली आहे, असे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आता कला, वाणिज्य शाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि एमबीए अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. यासाठी विद्यापीठाच्या वतीने लवकरच पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही केंद्र निवडून दूरस्थ पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठ ते पंधरा दिवसांचे अभ्यास सत्र आयोजित केली जाणार आहेत. अभ्यासक्रमाचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. 
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com