Pune : विमाननगर परिसरात वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic
पुणे : विमाननगर परिसरात वाहतुकीत बदल

पुणे : विमाननगर परिसरात वाहतुकीत बदल

पुणे - विमाननगर परिसरात मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी विमाननगर परिसरात 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत वाहतुकी बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

विमानतळ रस्त्यावरील लुंकड गोल्डकोस्ट ते टाऊन स्क्वेअर या दरम्यानचा रस्ता शनिवारी (ता.27) सायंकाळी सहा वाजल्यापासून वाहतुकीस बंद केला जाईल. त्यानंतर हा रस्ता 29 नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल, असे वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: पुणे : छातीत दुखत असल्यानं अण्णा हजारे रुबी हॉल रुग्णालयात दाखल

असा आहे पर्यायी मार्ग

* नगर रस्त्यावरून विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांनी लुंकड गोल्डकोस्ट (सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कुलसमोरून ) विमाननगर रस्त्याने उडाण गार्डन चौक येथून डावीकडेवळून कोणार्कनगर रस्त्याने बलघरे चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

* विमानतळाकडून रामवाडी, नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी टाऊन स्क्वेअर येथून डावीकडे वळून बलघरे चौकातून उडाण गार्डन चौकातून उजवीकडे वळून विमाननगर रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

loading image
go to top