नव्या जलवाहिनीसाठी निलायम पुलाजवळ वाहतूकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पर्वती ते लष्करपर्यन्त नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी पर्वती जवळील निलायम पुल येथील रस्ता ओलांडुन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुकीत 25 जून ते 9 जुलैपर्यंत बदल करण्यात येणार आहेत.

पुणे: पर्वती ते लष्करपर्यन्त नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी पर्वती जवळील निलायम पुल येथील रस्ता ओलांडुन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुकीत 25 जून ते 9 जुलैपर्यंत बदल करण्यात येणार आहेत.

महापालिकेच्यावतीने पर्वती जलकेंद्र ते लष्कर जलकेंद्रापर्यंत 2200 मिलिमीटर व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी निलायम पुलाजवळ रस्ता क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी दत्तवाडी वाहतुक विभागातर्फे निलायम पुलाजवळ वाहतूकीत 25 जून ते 9 जुलै पर्यंत बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन दत्तवाडी वाहतूक शाखेने केले आहे.

असा असेल वाहतुकीतील बदल !

जनता वसाहत व गजानन महाराज चौकाकडून निलायम पुलाजवलील ना.सी.फडके चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गजानन महाराज-शिवदर्शन चौक-मित्रमंडळ चौक- सावरकर चौक या मार्गाचा वापर करावा.

ना.सी.फडके चौकाकडून निलायम पुलाकडे जाणऱ्या वाहनांनी ना.सी.फडके चौकातून सरळ पर्वती ओव्हर ब्रीज खालून डावीकडे सावरकर चौक-मित्रमंडळ सर्कल-वर्धमान चौक-गजानन महाराज चौकातुन पुढे जावे. किंवा ना.सी.फडके चौकातुन सरळ पर्वती ओव्हर ब्रीज खालून सावरकर चौक-मित्रमंडळ मार्गे-शिवदर्शन चौक-गजानन महाराज चौक या मार्गांचा वापर करावा.

Web Title: Changes in traffic near Nilayam bridge for new water channel

टॅग्स