महत्वाची बातमी : पुण्यातील विद्यापीठ चौकातील वाहतूकीत बदल  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जुलै 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जवळील मुख्य चौकातील औंधकडे जाणारा व रेंज हिल्स पुलाचे दोन्ही रॅम्प काढण्याचे काम चालू झाल्याने आठ आॅगस्टपर्यंत वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जवळील मुख्य चौकातील औंधकडे जाणारा व रेंज हिल्स पुलाचे दोन्ही रॅम्प काढण्याचे काम चालू झाल्याने आठ आॅगस्टपर्यंत वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांनी गैरसोय टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे झालेला बदल लक्षात घेऊन प्रवास करावा व वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन चतु:शृंगी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी केले आहे. 

आणखी वाचा - कोरोनाबाबत पुण्याच्या महापौरांनी दिली धक्कादायक माहिती 

वाहतूकीत केलेला बदल खालीलप्रमाणे:

औंधच्या दिशेने शिवाजीनगरकडे येणारी वाहतूक चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोरून विद्यापीठाच्या मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येऊन डावीकडून सरळ  नेहमीच्या रस्त्याने शिवाजीनगरकडे वळवण्यात आली आहे. 

रेंजहिल पुलावरून जाणारी वाहतूक पुलाच्या उजवीकडून श्री सेवा इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या समोरून वळवून पुढे कृषी बँक महाविद्यालयासमोरून दुभाजक तोडून पुन्हा नेहमीच्या सरळ रस्त्याने शिवाजीनगरच्या दिशेने जाता येईल.

आणखी वाचा - पुण्यातून आली आनंदाची बातमी, दहा दिवसांत रुग्ण संख्येत पडला फरक

शिवाजीनगरकडून विद्यापीठकडे जाणारी वाहतूक सेंट्रल मॉल, संगण्णा धोत्रे पथ, ओम सुपर मार्केट, हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरीएट जंक्शन, सेनापती बापट रस्त्याने सरळ विद्यापीठ चौकातून पुढे पाषाण मार्गे पाषाण व बाणेरची वाहतूक वळवण्यात आली आहे. तर औंधकडे जाणारी वाहतूक ही पुर्वी औंधकडून शिवाजीनगरकडे येणा-या मार्गावरुन पुढे औंधकडे वळवण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in traffic at University Chowk in Pune