esakal | Video : कोरोनाबाबत पुण्याच्या महापौरांनी दिली धक्कादायक माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

pune mayor said that 400 to 500 deaths per day every month due to corona

 
पुणे शहर आणि परिसरातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरात आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला महापौर मोहोळ देखील उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहोळ यांनी ही माहिती दिली.

Video : कोरोनाबाबत पुण्याच्या महापौरांनी दिली धक्कादायक माहिती

sakal_logo
By
उमेश शेळके

पुणे : "ससून आणि खासगी हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला चारशे ते पाचशे अधिकचे मृत्यू होत आहेत. ते कोरोना होत आहेत. परंतु ते कोरोनाने झाले हे दाखविता येत नाहीत. कारण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी अथवा दाखल झाल्यानंतर त्यांचा मृत्यू लगेच होतो. मृत्यूनंतर एक्‍सरे काढल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतात,' असा धक्कादायक माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी दिली. मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनास ही गोष्ट आणून दिली असून याची चौकशी करावी, अशी मागणी केली आपण असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा    
 

पुणे शहर आणि परिसरातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरात आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला महापौर मोहोळ देखील उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहोळ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले," एखादा रुग्ण अत्यवस्थ असतो. त्यांनी कोरोनाची टेस्ट केलेली नसते. तो हॉस्पिटल मध्ये जाण्यापूर्वी अथवा दाखल झाल्यानंतर लगेच मृत्यू पावतो. केंद्राच्या ज्या गाईडलाईन आहेत. त्यानुसार मृत्यूनंतर कोरोनाचा टेस्ट केली जात नाही. ससून हॉस्पिटलचे देखील तेच म्हणणे आहे, ज्यावेळी मृताच्या छातीचा एक्‍सरे काढला जातो, तेव्हा त्यामध्ये कोरोनाच लक्षण असल्याचे दिसून येते. अशा दररोज बारा केस एकट्या ससून हॉस्पिटलमध्ये होत आहेत. हाच महिन्यांच्या साडेतीनशे आकडा झाला. तर खासगी हॉस्पिटलमध्ये दररोज पन्नास ते शंभर मृत्यू अशा प्रकारे होतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलून हे मृत्यूचे प्रमाण कमी केले पाहिजे.'' 

हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​

"माझा प्रशासनावर कोणताही आरोप नाही, परंतु हे वास्तव आहे, ते समोर आले पाहिजे. ते रोखता आले पाहिजे. खासगी हॉस्पिटल आणि प्रशासन यांच्या मध्ये समन्वय नाही, हे यावरून स्पष्ट होते. केंद्रीय पथक जे पुण्यात आले होते. त्यांचे देखील हेच निकर्ष होते.' असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर दिले. ते पुढे म्हणाले,"" पुणे महापालिकेने आतापर्यंत 250 ते 300 कोटी रुपये खर्च केले आहे. जम्बो हॉस्पिटलसाठी देखील 25 टक्के रक्कम देण्यास तयार आहे. महापालिकेच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे येथून पुढे राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे.'' 

ससून हॉस्पिटल राज्य सरकारच्या मदतीने टेस्टिंगची क्षमता वाढविण्याबाबत चर्चा झाली होती. त्यास दोन महिने झाले, प्रत्यक्षात ती वाढलेली नाही. त्यामुळे ससून आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्याकडील टेस्टिंगची क्षमता वाढवावी, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!​

खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेडस्‌ ताब्यात घेतले आहे, असे सांगितले जाते. परंतु वास्तव तसे नाही. हॉस्पीटलकडून जे बिल दिले जाते. त्यातून नागरिकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होते. त्यामुळे हॉस्पीटलकडून जे बिल दिले जाते, त्याचे प्री ऑडिट झाले पाहिजे. आयसीयू आणि ऑक्‍सिजन बेड पुण्यात कमी पडत आहे. या संदर्भात जम्बो सेंटर्सच्या आधी सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही महापौर म्हणाले. 

loading image