शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोच्या स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून वाहनांना शिवाजीनगर चौकातून नरवीर तानाजी वाडीकडे जाण्यास मनाई केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

पुणे - शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोच्या स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून वाहनांना शिवाजीनगर चौकातून नरवीर तानाजी वाडीकडे जाण्यास मनाई केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे बदल
शिवाजी महाराज रस्त्याने स. गो. बर्वे चौकातून पुणे वेधशाळा चौकात येणारी वाहतूक वेधशाळा चौकातून वळविली आहे. वेधशाळेसमोरील चौकातून शिवाजीनगर एसटी स्थानक, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जाण्यास मनाई केली आहे. 

पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला

असा आहे पर्यायी मार्ग...

  • स. गो. बर्वे चौक, वेधशाळा येथील चौकातून डावीकडे वळून चापेकर चौकातून (म्हसोबा गेट) वळून हातकागद संस्था, साखर संकुलमार्गे नरवीर तानाजी वाडीकडे जाता येईल. 
  • वाहनचालकांनी चापेकर चौकातून वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्याने प्राइड हॉटेल व एलआयसी कार्यालय यांच्यासमोरील गल्लीतून दळवी हॉस्पिटलमार्गे नरवीर तानाजीवाडीकडे जाता येईल. 
  • वेधशाळा चौकातून डावीकडे वळून आकाशवाणी, शिवाजीनगर एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन मार्गे पुढे जाता येईल.

बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in transport for Shivajinagar metro station work