बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश

ajit pawar baramati
ajit pawar baramati

बारामती (पुणे) : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

  पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...        
बारामती येथील विद्या प्रतिष्‍ठानच्या व्हिआयटी हॉलमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन व विकास कामांचा आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव , तालुका कृषी अधिकारी पडवळ , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी व अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधावे. तसेच, तपासणी संख्या वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याची खबरदारी घेण्याचे आणि नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. 

दरम्यान, या वेळी अजित पवार यांनी तांदूळवाडी येथील पिण्‍याच्‍या पाण्याचा तलाव व सुरु असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. बारामती तालुक्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचे अवैद्य धंदे चालणार नाहीत, याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी व अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा कडक सूचना या वेळी त्यांनी पोलिसांना केल्या. 

कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या आर्थिक वर्षामध्ये ज्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, त्याकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वेळेत पूर्णपणे वापर करावा. 
 - अजित पवार, उपमुख्यमंत्री           

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com