पुणेकरांनो, उद्यापासून वाहतूकीत होणार 'हे' बदल कारण... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त 18 ते 26 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आळंदी येथे राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यादृष्टीने वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणारे रस्ते 
पुणे- आळंदी रस्ता दिघी ते मॅक्‍झीन चौक, मोशी-आळंदी रस्ता डुडुळगाव जकात नाक्‍यापर्यंत, चाकण-आळंदी रस्ता कारवा धर्मशाळा, वडगाव घेणंद-आळंदी रस्ता विश्रांवाडी, मरकळ-आळंदी रस्ता पीसीएस कंपनी फाट्यापर्यंत, चिंबळी-आळंदी रस्ता केळगाव चौक. 

पर्यायी मार्ग 
पुणे-दिघी मॅगझीन चौक-भोसरी-मोशी- चाकण, मोशी-चाकण-शिक्रापूर, मोशी -भोसरी-मॅक्‍झीन चौक- दिघी, चाकण- मोशी- मॅक्‍झीन चौक-दिघी- पुणे, चाकण- पिंपळगाव फाटा- मरकळ- लोणीकंद, वडगाव घेणंद- पिंपळगाव फाटा-चाकण-नाशिक महामार्ग, मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द बाह्यवळण रस्ता, मरकळ-कोयाळी- वडगाव घेणंद-पिपंळगाव फाटा-चाकण, चिंबळी-मोशी-भोसरी-मॅक्‍झीन चौक-दिघी-पुणे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: changes in transport from tomorrow in pune