

Jejuri Darshan Turns Chaotic as Bulls Go Uncontrolled
Sakal
जेजुरी : खंडोबा गडाच्या पूर्व बाजूला जुनी जेजुरी येथील पायरी मार्गावर रविवारी (ता. ८) सकाळी शर्यतीचे बैल दर्शनासाठी आणलेले बैल चौफेर उधळले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक बैल उधळल्याने परिसरातील भाविक सैरावैरा धावू लागले. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.