Pune Municipal Corporation: पुणे पालिकेतील गणेश मंडळांच्या बैठकीत गोंधळ
Ganesh Festival 2025: पुण्यातील महापालिकेच्या गणेशोत्सव तयारी बैठकीत स्वयंसेवी संस्था आणि हिंदी भाषेच्या वापरावरून वाद उद्भवला. गणेश मंडळांनी बैठकीत स्पष्ट भूमिका घेत पर्यावरणवाद्यांचा सहभागावर आक्षेप घेतला.
पुणे : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिका प्रशासनाने सोमवारी बोलाविलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत गोंधळ उडाला. बैठक गणेशोत्सव मंडळांसाठी असताना त्यामध्ये पर्यावरणवादी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी कसे आले? असा आक्षेप गणेशोत्सव मंडळांनी घेतला.