धर्मादाय पुणे विभाग पुन्हा एकदा अव्वल

धर्मादाय कार्यालयाकडील प्रलंबित वाद नसलेले बदल अर्ज (चेंज रिपेार्ट) आणि स्थावर मिळकत बदल अर्ज निकाली काढून पुणे विभाग हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.
pune city
pune citysakal
Summary

धर्मादाय कार्यालयाकडील प्रलंबित वाद नसलेले बदल अर्ज (चेंज रिपेार्ट) आणि स्थावर मिळकत बदल अर्ज निकाली काढून पुणे विभाग हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.

पुणे - धर्मादाय कार्यालयाकडील प्रलंबित वाद नसलेले बदल अर्ज (चेंज रिपेार्ट) (Change Report) आणि स्थावर मिळकत बदल अर्ज निकाली काढून पुणे विभाग (Pune Department) हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अव्वल (Top) ठरला आहे.

धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांच्या सूचनेनुसार १४ मार्च ते २५ मार्च २०२२ या कालावधीत प्रलंबित नसलेले बदल अर्ज, स्थावर मिळकत बदल अर्ज आणि कलम ५० अन्वये योजना अर्ज निकाली काढण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेमध्ये पुणे विभागामध्ये सहा हजार ४५० इतकी प्रकरणे होती. त्यापैकी दोन हजार ३८ प्रकरणे निकाली काढून पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.

पुणे विभागांतर्गत पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर अशा चार जिल्ह्यांचा समावेश होतो. विनावाद बदल अहवालांची ‘झिरो पेंडन्सी’ व्हावी, यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत धर्मादाय कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वकील, पक्षकारांचे सहकार्य प्राप्त झाले. या सर्वांच्या योगदानामुळे पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे, असे धर्मादाय सहआयुक्त सुधीर कुमार बुक्के यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com