pune road
pune roadsakal

Pune News : एकदाचा चऱ्होली-वाघोली रस्त्याला मुहूर्त लागला ; वळसा व कोंडी टळणार

चऱ्होली-वाघोली रस्त्याला मुहूर्त, पुणे महापालिकेच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर रस्त्याची उभारणी

पिंपरी : चऱ्होलीतून वाघोलीला जाण्यासाठी सध्या तीन मार्ग आहेत. त्याद्वारे दोन्ही गावांतील किमान अंतर १६.५ आणि कमाल अंतर २७ किलोमीटर आहे. त्यामुळे वेळ व पैसा अधिक लागत आहे. आता पुणे महापालिकेने हाती घेतलेल्या नवीन रस्त्यामुळे दोन्ही गावे अवघी ५.७ किलोमीटरवर येणार असून, रहदारीही सुसाट होईल. हा रस्ता आठ पदरी नियोजित असून कामाचे आदेश दिले आहेत. खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) रस्ता उभारणीसाठी कंत्राटदार कंपनीला तीन वर्षांची मुदत दिली आहे. या रस्त्यामुळे चऱ्होलीसह आळंदी, देहू, भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड, चाकण ही गावे वाघोलीच्या अर्थात नगर रस्त्याच्या अगदी जवळ येणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटणार आहे.

पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून ते पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील चऱ्होलीच्या हद्दीपर्यंत रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे पीएमआरडीएचा रिंगरोड, वडगाव शिंदे व लोहगाव या गावांचीही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

पुणे महापालिकेतर्फे हा रस्ता विकसित केला जाणार आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरून येरवडामार्गे पिंपरी-चिंचवड किंवा मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पुण्याऐवजी थेट मार्ग मिळणार आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंगरोडला कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

सद्यःस्थिती...

नगर रस्त्यामार्गे येणारी वाहने येरवडा, विश्रांतवाडी किंवा खडकी, बोपोडीमार्गे पिंपरी-चिंचवडला जातात. यामध्ये ट्रक, प्रवासी बस, कंटेनर अशा अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे अनेकदा कोंडी होते. शिवाय, अंतरही जास्त आहे. त्यामुळे वेळ, इंधन व खर्च अधिक लागत आहे.

भविष्यात...

पुण्यातील खराडी, येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, बोपोडी आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, दिघी, भोसरीत होणारी वाहतूक कोंडी टळेल. पिंपरी, चिंचवड, निगडी, चऱ्होली, आळंदी या गावांचे वाघोलीशी असलेले सध्याचे अंतर कमी होईल. वेळ, इंधन व पैशांची बचत होईल.

असे आहे नियोजन

दोन्ही बाजूला सेवारस्ते

रस्त्यालगत पावसाळी गटारे

प्रकाश व्यवस्थेसाठी पथदिवे

वाहतूक नियंत्रक दिवे

हे रस्ते जोडणार

आळंदी-पुणे पालखी मार्ग

पुणे-नाशिक महामार्ग

मुंबई-पुणे महामार्ग

मुंबई-बंगळरू महामार्ग

सध्याचे

चऱ्होली-वाघोली

अंतर (किलोमीटर)

लोहगाव मार्गे ः १४.६

धानोरी मार्गे ः १६.५

विश्रांतवाडी मार्गे ः २०

मरकळ, तुळापूर मार्गे ः २७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com